NCP news; काँग्रेस मुळेच महाविकास आघाडीचा पराभव झाला!

राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी काँग्रेस नेतृत्वार टिका केली.
Nana Patole & Anita Bhamre
Nana Patole & Anita BhamreSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : (Nashik) पदवीधर मतदारसंघाच्या (Graduate Constituency election) उमेदवारीबाबत काँग्रेसच्या (Congress) नेतृत्वाने चुकीचा निर्णय गेतला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांचा पराभव झाला, अन्यथा राज्यातील सत्ताधारी शिंदे गट (Eknath Shinde) व भाजपची (BJP) स्थिती दारूण झाली असती. काँग्रेस पक्षाने अंतर्गत हेवेदाव्याच्या राजकारणामुळे ही संधी घालवली, अशी टिका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या (NCP) शहराध्यक्ष अनिता भामरे (Anita Bhamre) यांनी केली आहे. (NCP womens wing Criticize Congress for wrong decision for Graduate constituency election)

Nana Patole & Anita Bhamre
BJP News; भाजपचे कार्यकर्ते भडकले, जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारले!

श्रीमती भामरे म्हणाल्या, काँग्रेस पक्षाकडे हक्काचा उमेदवार होता. त्यांना उमेदवारी देताना काही बेबनाव झाला असेल तर आजच्या स्थितीत भाजपला कमकुवत करण्यासाठी राज्यातील नेतृत्वाने पुढाकार घेऊन चर्चा करायला हवी होती. मार्ग नक्की निघाला असता. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील वक्तव्य केले होते. मात्र काँग्रेसने याबाबत चुक केली, असा संदेश गेला आहे.

Nana Patole & Anita Bhamre
Satyajit Tambe News; सत्यजित तांबेंचा विजय, भाजपसाठी धडा!

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व गेल्या तीन टर्मपासून काँग्रेसचे आमदार डॉ. सुधीर तांबे करीत होते. यावेळी ही डॉ. तांबे निवडणूक लढविण्यासाठी तयार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षातील कोणत्याही उमेदवाराने इच्छा व्यक्त केली नाही. याला कारण म्हणजे इच्छा व्यक्त करून सुध्दा डॉ. तांबे यांच्याएव्हढा एकही सक्षम उमेदवार इतर पक्षांकडे नव्हता.

अशा स्थितीत हे सगळं काँग्रेस पक्षाला माहित असतांना डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी करण्यासाठी पक्षाने का आग्रह धरावा?. त्याऐवजी तरूण उमेदवार म्हणून सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्याची नेमकी अडचण कोणती होती? शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसचा उमेदवार कोण हा घोळ सुरूच होता. अखेर सत्यजित तांबेनी अपक्ष उमेदवारी केली. याऐवजी काँग्रेसने रितसर सत्यजित तांबेना उमेदवारी देऊन एकहाती विजय मिळवला असता तर महाविकास आघाडीच्या शिरपेचात नक्कीच मानाचा तुरा खोवला गेला असता.

निकालानंतर आता नको त्या गोष्टींवर चर्चा होत आहे. भाजपने दुसर्‍याचे घर फोडले. राजकारणात साम, दाम, दंड, भेद या गोष्टी सर्व पक्षांना ज्ञात असतांना भाजपला दोष देण्यात अर्थ काय? जे भाजपला समजते ते महाविकास आघाडीला का उमजत नाही? महाविकास आघाडीत अनेक दिग्गज नेते असतांना एकटे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सगळ्यांना भारी कसे पडतात हा प्रश्न आम्हां सर्व सामान्य कार्यकर्त्यांना पडतो.

केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असतांना देखील भाजपने नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात उमेदवारी न करता सत्यजित तांबेना अपक्ष निवडून आणले यातच सर्व काही दडले आहे, असे समजून उद्या अधिकृतरीत्या आमदार सत्यजित तांबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर काँग्रेसने मुळीच वाईट वाटून घेऊ नये. खंत एकच वाटते की या लढाईत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा नाहक पराभव झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com