`राष्ट्रवादीचा खासदार, आमदार नाही...तरीही कामगिरी जोमदार!`

वाशिम जिल्ह्यातील (Washim ZP) जिल्हा परिषद पोटनिवडणुकांत पक्षाला चांगल्या जागा मिळाल्या.
 Rajendra Shingane .jpg
Rajendra Shingane .jpgsarkarnama
Published on
Updated on

वाशीम : नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जिल्ह्यात सर्वाधिक जागा जिंकून विदर्भात नवीन ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीला नंबर एकचा पक्ष करायचे असेल तर, प्रामाणिक प्रयत्नाची गरज असून, गटबाजीला कुठलाच थारा मिळणार नसल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संपर्कमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन्न मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले.

राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समित्यामधील विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुभाषराव ठाकरे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये पक्ष निरीक्षक तथा प्रदेश सरचिटणीस डॉ. संजय रोडगे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्यासह व्यासपीठावर ज्येष्ठ नेते बाबाराव खडसे, पांडुरंग ठाकरे, माधवराव अंभोरे, दिलीप जाधव, दत्तराज डहाके, श्रीधर कानकिरड, वसंतकाका शेगीकर, विठ्ठलराव गावंडे, महिला जिल्हाध्यक्षा शुभदा नायक, सुरेश गावंडे, आदींची उपस्थिती होती.

 Rajendra Shingane .jpg
काँग्रेस आमदार जगतापांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा!

यावेळी विजयी सदस्यांचा सत्कार करण्यात आला तसेच ज्या सदस्यांनी चांगली लढत दिली परंतु, विजय प्राप्त करू शकले नाही, अशा सदस्यांचा देखील सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना संपर्कमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आहे. जिल्ह्यात देखील महाविकास आघाडीचे सरकार येईल. जे पदाधिकारी पक्षविरोधात वागतात त्यांचावर कारवाई करून पक्षशिस्तीला प्राधान्य दिले जाईल.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे म्हणाले की, जिल्ह्यात पार पडलेल्या पोट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जागा वाढल्या आहेत. त्यातच काही सदस्यांनी पक्षविरोधात सदस्यांना रसद पुरविली. परिणामी काही जागा थोडक्यात गमवाव्या लागल्या. त्यामुळे अशा लोकांवर कडक कारवाई करावी.

पक्ष निरीक्षक डॉ. संजय रोडगे म्हणाले की, जिवाचं रान करून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते लढले. ही चांगली बाब आहे. अशातच ठाकरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला तरीही, जिल्ह्यात पक्षाने पोटनिवडणुकीत घवघवीत यश संपादन केले. जिल्ह्यात राष्ट्रवादीचा आमदार नाही, खासदार नाही तरीही जिल्ह्यात राष्ट्रवादीची मजबूत पकड आहे. शहरी भागात देखील पक्ष्याची ताकत वाढविण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे. माजी मंत्री सुभाषराव ठाकरे म्हणाले की, जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढविण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे. आपसातील मतभेद आपसातच मिटवून जिल्ह्यात पक्ष कसा वाढविता येईल यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे.

या कार्यक्रमाला सर्व सेलचे प्रमुख, पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य तसेच नवनिर्वाचित सदस्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्तविक नारायण बारड यांनी केले. सूत्रसंचालन गजानन आरू, श्याम देवळे यांनी केले तर, आभार राजु गुल्हाने यांनी मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com