NCP Leader : अंजली दमानिया फ्रॉड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याचा आरोप, म्हणाले...

NCP Leader Prashant Pawar : कुणाच्या तरी सांगण्यावरून त्या अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट करीत असल्याचे बोलले जात आहे.
NCP Prashant pawar
NCP Prashant pawarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि पिक विमा घोटाळ्याचे रोज नवे आरोप राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केले जात आहेत. अंजली दमानिया यांनी मुंडे कृषी मंत्री असताना दुप्पट दराने खरेदी केलेल्या कृषी साहित्यांची यादीच वाचवून दाखवली होती. कुणाच्या तरी सांगण्यावरून त्या अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट करीत असल्याचे बोलले जात आहे.

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रशांत पवार यांनी खोटे डॉक्युमेंट दाखवून लोकांना बदनाम करण्याची दमानिया यांची सवयच असल्याचा आरोप केला. त्यांनी आजवर ज्या ज्या लोकांवर आरोप केले त्यापैकी एकही आरोप त्या सिद्ध करू शकल्या नाहीत. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यावरसुद्धा त्यांनी यापूर्वी असेच बेछूट आरोप केले होते असेही पवार यांनी सांगितले.

NCP Prashant pawar
Sheila Dixit : होय, दिल्लीच्या शिल्पकार शीला दीक्षितच!

अंजली दमानिया यांचा नागपूरचा काही संबंध नाही. असे असतानाही त्या नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या विरोधात नागपूर लढल्या होत्या. त्यानंतर त्यांनी गडकरी यांच्यावर आरोप करणे सुरू केले. मात्र त्यांनी भिक घातली. त्या एकही आरोप आजवर सिद्ध करू शकल्या नाहीत. आता त्यांनी कोणाची तरी सुपारी घेऊन धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यावर आरोप करणे सुरू केले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाम भूमिका घेतली आहे. जो पर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

त्यामुळे आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी आता अंजली दमानिया यांची आहे. दमानिया आणि उद्धव सेनेचे प्रवक्ते संजय राऊत एका माळेच मणी आहेत. रोज मीडिया समोर येऊन काहीही खळबळजनक आरोप करायचे आणि स्वतःला चर्चेत ठेवायचे ही त्यांना सवय आहे. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यानंतर दमानिया यांनी आता अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यांनी जे आरोप लावले आहे ते जुनेच आहे. सिंचन घोटाळ्याचे आरोपांवर न्यायालयाने निकाल दिला आहे.

NCP Prashant pawar
Top 10 News : राजकीय नेत्यांची 'प्यार वाली लवस्टोरी'; करुणा मुंडेंनी मानले फडणवीसांचे आभार? नेमकं कारण काय? - वाचा महत्त्वाच्या घडामोडी

आरोप करणाऱ्यांपैकी एकाहीला न्यायालयात पुरावे सादर करता आले नाही. त्यामुळे दादांना क्लिनचिट देण्यात आली आहे. मीडियासमोर येऊन अंजली दमानिया आणि संजय राऊत लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. धनंजय मुंडे यांच्या खरेदी संदर्भात नागपूरच्या उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. असे असताना दमानिया बाहेर बेछूट आरोप करीत आहेत. हा एक प्रकारे न्यायलयावर दबाव टाकण्याचा प्रकार असल्याचेही प्रशांत पवार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com