NCP Meeting News : राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना प्रथमच मिळाली नेतृत्वाची संधी !

Workers in the second tier : प्रथमच दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी मिळाली आहे.
Baba Gujar and Prashant Pawar
Baba Gujar and Prashant PawarSarkarnama

Nagpur Political News : राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) सध्या फुल्ल फॉर्मात दिसत आहे. उद्या (ता. २) पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या इतिहासात अभूतपूर्व असा हा मेळावा होणार असल्याचा दावा शहर अध्यक्ष प्रशांत पवार आणि जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी केला आहे. (This gathering will be unprecedented in the history of NCP)

मेळावा झाल्यानंतर नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवण्यासाठी एका रथाची निर्मिती करण्यात आली आहे. हा रथ घरोघरी जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहे. स्थानिक प्रशासनाकडे पाठपुरावा करून त्यांच्या समस्या सोडवण्यात येणार असल्याचे प्रशांत पवार यांनी सांगितले.

आतापर्यंत दोन नेत्यांनी राष्ट्रवादीला (NCP) आपल्याच मतदारसंघात संकुचित करून ठेवले होते. प्रथमच दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी मिळाली आहे. त्यामुळे हा मेळावा राष्ट्रवादीच्या इतिहासात अभूतपूर्व राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) (Ajit Pawar) शनिवारी दुपारी ३ वाजता देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसला घरोघरी पोचवण्याचा संकल्प करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, (Prafull Patel) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न व नागरी प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्याला नागपूर जिल्ह्यातील सुमारे ४ हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचा दावा शहराध्यक्ष प्रशांत पवार आणि जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी काल (ता. ३१ ऑगस्ट) पत्रकार परिषदेत केला.

Baba Gujar and Prashant Pawar
Ajit Pawar News: गेल्या वेळी दांडी मारलेल्या अजितदादांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या स्नेह भोजनाला लावली हजेरी

पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर नागपूर जिल्ह्याचा हा पहिलाच मेळावा आहे. या मेळाव्यात अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते अजित पवार गटात सहभागी होणार आहेत. पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहीरकर, शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, राजेश माटे, अरविंद भाजीपाले, मिलिंद महादेवकर आदी उपस्थित होते.

हा मेळावा म्हणजे शक्तिप्रदर्शन असणार आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीची तयारी या मेळाव्यातून होणार असल्याचे पवार यांनी सांगितले. अजित पवार गटाच्या मेळाव्यांची सुरुवात उपराजधानी नागपुरातून व्हावी, अशी ज्येष्ठ नेत्यांची इच्छा आहे.

Baba Gujar and Prashant Pawar
NCP Ajit Pawar News : अजित पवार गट म्हणतो राष्ट्रवादी आमचीच, कुंपणावरील कार्यकर्तेही आमच्याकडेच येणार !

त्यानुसार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात नागपुरात मेळावा होणार आहे. त्यानंतर वर्धा, अमरावती व चंद्रपूर येथे मेळावे घेण्यात येतील. त्यानंतर विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये मेळावे घेण्यात येणार आहेत. या मेळाव्यांदरम्यान काही मतदारसंघांवर दावे करण्यात येणार आहेत, असेही प्रशांत पवार यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com