राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरीच शिंदे गटाच्या संपर्कात...

Amol Mitkari : भाजप कोणताही डबलगेम करत नाही.
Amol Mitkari, Abdul Sattar Latest News
Amol Mitkari, Abdul Sattar Latest News Sarkarnama
Published on
Updated on

अकोला : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ बघायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेसोबत ४० आमदार आणि १२ खासदारांसह बंड केल्यानंतर राज्यातील राजकारणातील अनेक समीकरणं बदलली आहेत. शिंदे यांनी आम्हीच खरी शिवसेना (Shivsena) म्हणत भाजपसोबत युती केली आणि राज्यात नवं सरकार स्थापन केलं आहे.

यामुळे शिवसेना दोन गटात विभागली आहे. दरम्यान याबाबतचा तिढा हा सुप्रिम कोर्टात आहे. मात्र, तुर्तास शिंदे गट- भाजप नेते आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगतांना दिसत आहे.

दरम्यान दोन्ही बाजूकडून नवनवीन दावे केले जात असून आमदार आमच्या संपर्कात असल्याच बोललं जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलेल्या दाव्यावर उत्तर देतांना आम्ही कुणीही त्यांच्या संपर्कात नाही मात्र मिटकरीच आमच्या संपर्कात आहेत, असे वक्तव्य शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdu Sattar) यांनी केलं आहे. ते अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Amol Mitkari, Abdul Sattar Latest News
उद्धव ठाकरेंनी लोकांना ब्लॅकमेल करणं बंद करावं...

अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत असे वक्तव्य मिटकरींनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरच सत्तारांनी प्रत्युत्तर दिले आहे. सत्तार म्हणाले की, आम्ही कुणी आमदार त्यांच्या संपर्कात नाही, मात्र राष्ट्रवादीचे अमोल मिटकरीच आमच्या संपर्कात आहेत. त्यांनीच कधी येतायत हे सांगाव. इतकच नाही तर मिटकरींना चांगल्या डॉक्टरला दाखवायची गरज आहे. त्यानंतरच मिटकरींमध्ये काय फॉल्ट आहे हे कळेल, असा खोचक टोला देखील सत्तारांनी लगावला आहे.

ते म्हणाले की, आमचं सरकार हे सामान्य माणसांच सरकार असून. शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही दिवसरात्र कार्यरत असल्याचंही सत्तारांनी सांगितले. औरंगाबादमध्ये मंत्रीपदासाठी भाजप कोणताही डबलगेम करत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं

Amol Mitkari, Abdul Sattar Latest News
'वसुलीचा छंद जुना, राष्ट्रवादी पुन्हा' : भाजप नेत्याचा पवारांना टोला...

दरम्यान, अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे वक्तव्य मिटकरींनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. तसेच भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये डावललं जात असून त्यांनी राष्ट्रवादीत यावं अशी खुल आवाहनही त्यांनी केलं होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही मिटकरींवर टीका करतांना मिटकरींनी राष्ट्रवादीतच काय सुरू आहे त्याकडे जरा लक्ष द्या, असे म्हणत मिटकरींना टोला लगावला होता.

तसेच पंकजा मुंडेंच्या रक्तात भाजप आहे. त्या राष्ट्रीय नेत्या असून, मध्य प्रदेशाच्या सहप्रभारी आहेत. त्या कधीच भाजप सोडण्याचा विचार करू शकत नाहीत. त्यामुळे अमोल मिटकरी यांनी स्वप्न पाहू नये, असे बावनकुळेंनी मिटकरींना सुनावले होते. गेल्या काही दिवसांपासून मिटकरी आणि भाजप नेत्यांमध्ये अनेक खटके उडतांना दिसत असून त्यांचा प्रत्यय विधिमंडळाच्या पायऱ्यावर झालेल्या गोंधलातही दिसून आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com