Nagpur News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत विधान केले आहे.
मागील विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी हे विधान करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना टोला लगावला आहे.
शरद पवार यांना वाटलं असते तर अजितदादा (Ajit Pawar) मुख्यमंत्री झाले असते. जास्त जागा असतांना सुद्धा काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिले. अजित दादा हे नेतृत्व करणारे नेते आहेत. त्यांना कुठेतरी डावलयं जात आहे, असा आरोप धर्मराव बाबा आत्राम यांनी केला. अजितदादा मुख्यमंत्रीपदी शोभून दिसतील, असे ते म्हणाले.
नुकतेच राज्याचे बजेट मांडण्यात आले. यामधून अजितदादांनी त्यांनी अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही महायुतीत 80 ते 90 जागा मागणार आहोत, महायुतीतील नेते याबाबत निर्णय घेतील, असे ते म्हणाले.
महाविकास आघाडीच्या नेत्यांवर धर्मराव बाबा आत्राम यांनी टीका केली. 'खुर्ची एक, पक्ष तीन आहे, त्यांच्यात चर्चा सुरू आहे. एक खासदाराहून डबल आकड्यात आले. खुर्ची एक नेते तीन, प्रत्येक जण आपल्या पक्षातील नेता मुख्यमंत्री होईल,असे सांगत आहे. निवडणूक झाल्यावर कळेल कोण मुख्यमंत्री होईल, असा टोमणा त्यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.