Vijay Wadettiwar and Devendra Fadanvis
Vijay Wadettiwar and Devendra FadanvisSarkarnama

NCP News: बॉसने आधी डिमोशन केले अन् आता त्या ‘पोस्ट’चेही दोन तुकडे, कासरे ओढणाऱ्यांचे हात लाल होतील !

Congress : कॉंग्रेसमधील एक गट भाजपमध्ये जाण्याची चर्चा सुरू आहे.

NCP News Maharashtra: जितेंद्र आव्हाड यांना गटनेता नाही, तर मुख्य प्रतोद म्हणून नियुक्त केले आहे. गटनेता किंवा विरोधी पक्षनेता नियुक्त करण्याचे काम विधानसभेचे अध्यक्ष करतात. पक्ष अशा पद्धतीने घोषित करता येत नाही, तर अध्यक्षांकडे संख्याबळ द्यावं लागतं. त्यानंतर ही प्रक्रिया होते, असे कॉंग्रेस नेते माजी मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. (No one will participate in the Shinde-Fadnavis Government)

महाराष्ट्रात काल (ता. २) राजकीय भूकंप झाल्यानंतर आमदार वडेट्टीवार आज (ता. ३) नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, कॉंग्रेसमधील एक गट भाजपमध्ये जाण्याची चर्चा सुरू आहे, याबाबतीत विचारले असता, पूर्णच्या पूर्ण २८८ आमदार घेऊन टाका. म्हणजे विषयच संपेल, असे सांगत कुणीही शिंदे-फडणवीसांच्या सत्तेत सहभागी होणार नाही.

आधी बॉसचे डिमोशन केले. मग अनिच्छेने का होईना, त्या बॉसने त्या पदावर काम केले. कारण तेव्हा त्यांच्याच नेत्यांची वक्तव्ये बोलकी होती. आता त्याच पदाचे दोन तुकडे केले. त्या बॉसला आता काय वाटत असेल, याचा विचार पडला आहे, असे म्हणत आमदार वडेट्टीवारांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

भाजप श्रेष्ठींनी फडणवीसांना मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचत उपमुख्यमंत्री केले. अनिच्छेने का होईना, त्यांनी ते स्वीकारलं. पण आता उपमुख्यमंत्रिपदाचेही दोन तुकडे केले, फडणवीस हे सहन करतील का, असा प्रश्‍न चर्चिला जात आहे. कुठे फडणवीसांचा पर्याय तर भाजप श्रेष्ठी तयार करत नाहीत ना, अशी चर्चा महाराष्ट्रात कालपासून सुरू आहे.

Vijay Wadettiwar and Devendra Fadanvis
आता 'ती' गल्लत करत नाही | Supriya Sule On Ajit Pawar | Sarkarnama | #shorts

स्थिती काहीही असो पण या प्रकारातून अस्थिरताच वाढणार आहे. हे लोक स्थिर सरकार देऊ शकणार नाही, असे आमदार वडेट्टीवार म्हणाले. उत्तर प्रदेशात यापूर्वी दोन उपमुख्यमंत्री होत होते. पण ते एकाच पक्षाचे होते. उत्तर प्रदेश मोठे राज्य आहे. ४०० आमदार आहेत. पण महाराष्ट्रात तर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री तिघेही वेगवेगळ्या पक्षांचे आहे.

फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही सारख्याच ताकदीचे नेते आहेत. हे सांगताना वडेट्टीवारांनी बैलगाडीचे उदाहरण दिले. ते म्हणाले, बैलगाडीला दोन पैकी एक बैल कमजोर असला, तर दुसरा बैल त्याला सोबतीने ओढतो. पण दोन्ही बैल ताकदीचे असले की दोघेही दोन दिशांना पळण्याचा प्रयत्न करतात आणि बैलगाडी हाकणाऱ्याचे हात कासरे ओढता-ओढता लाल होतात. आता कासरे ओढणाऱ्याचे हात लाल होण्याची पूर्ण शक्यता आहे.

Vijay Wadettiwar and Devendra Fadanvis
Ajit Pawar NCP Office: राष्ट्रवादीच्या कार्यालयावर अजित पवार गटाचा दावा !

ते फडणवीसच सांगू शकतील..

महाराष्‍ट्रात (Maharashtra) काल (ता. २) राजकीय भूकंप झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) दिल्लीच्या राजकारणात जातील, अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबतीत विचारले असता, याबाबतीत त्यांच्या श्रेष्ठींना केंद्रात फडणवीसांची गरज असेल, तर ते त्यांना बोलावतील. पण याबाबतीत नक्की काय ते फडणवीस सांगू शकतील, असे आमदार वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com