NCP News : राष्ट्रवादीत भाकरी फिरवली, प्रदेश प्रवक्ते भडकले; शहराध्यक्ष म्हणतात देशमुखांच्या सांगण्यावरून केले !

Nagpur : चार विधानसभा मतदारसंघांचे अध्यक्ष त्यांनी बदलले.
Pravin Kune Patil, Anil Deshmukh and Duneshwar Pethe
Pravin Kune Patil, Anil Deshmukh and Duneshwar PetheSarkarnama

City President Duneshwar Pethe made changes : नागपूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये शहराध्यक्ष दुनेश्‍वर पेठे यांनी बदल केले. चार विधानसभा मतदारसंघांचे अध्यक्ष त्यांनी बदलले. यानंतर पदाधिकाऱ्यांमध्ये वाद सुरू झाला. प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी या नियुक्त्यांना विरोध केला असून शहराध्यक्षांचा निषेध केला आहे. (Praveen Kunte Patil opposed these appointments)

राष्ट्रवादी काँग्रेसने शहरातील चार विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष बदलले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाकरी फिरवल्याने पक्षातील काही नेते नाराज झाले असून शहराध्यक्षाच्या निर्णयाचा प्रदेश प्रवक्त्यांनी जाहीर निषेध नोंदवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

पूर्व नागपूरमध्ये नवनियुक्त अध्यक्ष म्हणून चिंटू महाराज व कार्याध्यक्षपदी आकाश थेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिममध्ये राजा बेग यांची पश्चिम नागपूरच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. दक्षिण नागपूरचे माजी अध्यक्ष सुखदेव वंजारी यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवण्यात आला. त्यांना बदलवून मोरेश्वर जाधव यांची नेमणूक करण्यात आली आहे.

दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात राजूसिंग चव्हाण व कार्याध्यक्षपदी आशुतोष बेलेकर यांची नेमणूक करण्यात आली. येथील माजी अध्यक्ष भैय्यालाल ठाकूर यांनी तब्येतीच्या कारणावरून तर पश्चिमचे माजी अध्यक्ष शैलेश पांडे यांना महापालिकेची निवडणूक लढायची असल्याने त्यांनी जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती.

Pravin Kune Patil, Anil Deshmukh and Duneshwar Pethe
Bhagirath Bhalke; NCP सोडणार, बाघा Sharad Pawar काय म्हणाले ? | Pandharpur Constituency | Sarkarnama

मंगळवारी (ता. ६) गणेशपेठ येथील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या सूचनेनुसार हे बदल करण्यात आल्याचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेश महासचिव रमण ठवकर, संतोष सिंह, शिव भेंडे, अशोक काटले, प्रशांत बनकर, नसीम सिद्दिकी आदी उपस्थित होते.

महापालिकेची (Municipal Corporation) निवडणूक तोंडावर आहे. अशा परिस्थितीत संघटनेत फेरबदल करणे चुकीचे आहे. संघटनेत फेरबदल करण्याचा अधिकार शहर अध्यक्षाला नाही. वरिष्ठांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील (Pravin Kunte Patil) यांनी केली. या फेरबदलाचा त्यांनी निषेधही नोंदवला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com