NCP State President News : राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष ओबीसी करण्याच्या हालचालींत सर्वांच्या नजरा नागपूरकडे !

Sharad Pawar : पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा एकदा भाकरी फिरवणार.
NCP
NCPSarkarnama
Published on
Updated on

The state president should be from the OBC community : राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्षपदावर काम करण्याची इच्छा प्रदर्शीत केल्यानंतर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्ष ओबीसी समाजाचा असावा, अशी सूचना केली. त्यानंतर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा एकदा भाकरी फिरवणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. (Ajit Pawar wants to work on the post of state president)

छगन भुजबळ यांनी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष ओबीसी समाजाचा करावा अशी मागणी करताना त्यांनी पाच नावे घेतली. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यामुळे सर्वांच्याच नजरा नागपूरकडे वळल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिन कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे ते आता प्रदेशाध्यक्ष होणार अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. अनेक नेत्यांनी तसे बोलूनही दाखवले आहे. मात्र छगन भुजबळ यांनी पक्षाचा अध्यक्ष ओबीसी समाजातून करावा अशी जाहीर मागणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली.

अनेकांनी भावी अध्यक्ष कोण व्हावा, अशी विचारणा केली असता त्यांनी माजी मंत्री सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांची नावे घेतली. आपण स्वतः ओबीसी असल्याचे सांगताना त्यांनी आणखी एका नावाचा उल्लेख केला. तो ईश्वर बाळबुधे यांचा होता. विशेष म्हणजे नागपूर येथे घेण्यात आलेल्या शिबिरात उपस्थित सर्वच नेत्यांनी ईश्वर बाळबुधे यांच्या कामाची तोंडभरून प्रशंसा केली होती.

NCP
NCP News : राष्ट्रवादीत पुन्हा महानाट्य होईल आणि त्याचा शेवट शरद पवार करतील, बावनकुळेंचं भाकीत !

नागपूरच्या (Nagpur) शिबिरात छगन भुजबळ (Chagan Bhujbal) आणि त्यांचे गुरु विचारवंत, संविधान, आरक्षणाचे अभ्यासक हरी नरके यांचाही समावेश होता. भुजबळ यांनी भाजप आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ओबीसी समाजाचे आहेत याकडे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही प्रदेशाध्यक्ष विदर्भातील (Vidarbha) आहेत. भाजप आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विदर्भातीलच आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा पुढील प्रदेशाध्यक्ष नागपुरातील असणार का, याची चर्चा रंगली आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com