Gram Panchayat : गोंदियात प्रफुल्ल पटेल, आमदार विनोद अग्रवाल, भाजपचे गोपाल अग्रवालांची प्रतिष्ठा पणाला

Gram Panchayat Elections : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मोठ्या नेत्यांनी कंबर कसली
Praful Patel and Vinod Agarwal
Praful Patel and Vinod AgarwalSarkarnama

Gram Panchayat Elections : राज्यात सात हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडत आहेत. त्या पार्श्वभूमीवरच गोंदिया जिल्ह्यातील ३४८ पैकी ३४५ ग्रामपंचायतीसाठी १८ डिसेंबरला मतदान तर २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel), तर नुकतेच काँग्रेससोडून (Congress) भाजपवासी (BJP) झालेले गोपाल अग्रवाल आणि विद्यमान आमदार विनोद अग्रवाल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे आता कोण बाजी मारणार आणि कोणत्या पक्षाच्या जास्त ग्रामपंचायती निवडून येणार हे २० डिसेंबरलाच समोर येणार आहे.

Praful Patel and Vinod Agarwal
Gram Panchayat Elections : थोरात-विखे सामना पुन्हा रंगणार; तालुक्यातील वर्चस्वासाठी दोन्ही गट मैदानात

जिल्ह्यातील ३४८ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रचाराला देखील सुरवात झाली आहे. तर पक्षीय राजकारण बाजूला ठेवत गोंदिया जिल्ह्यातील 3 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींची जिल्ह्यात चर्चा होत आहे.

यामध्ये गोरेगाव तालुक्यातील घुम्मरा, मुरदोली आणि देवरी तालुक्यातील डवकी या तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. घुमरा येथे काँग्रेसच्या महिला सरपंच सविता फुंडे, मुरदोलीमध्ये सरपंच महिला पुष्पा टेकाम तर डवकीमध्ये काँग्रेसचे सरपंच गौरव प्रसगाए यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Praful Patel and Vinod Agarwal
Jalna : ध्यान, मनशांतीवर उद्धव ठाकरेंची कैलास महाराजांशी चर्चा..

दरम्यान, निवडणुका म्हटलं की खर्चाचा डोंगर समोर उभा राहतो. पण या सर्वाला फाटा देत घुम्मरा, मुरदोली, डवकी या तिनही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. एवढंच नव्हे तर सरपंचांची देखील सर्वांच्या सहमतीने निवड करण्यात आली आहे. या तिनही गावांना आता शासनाच्यावतीने २५ लाख रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे गावाच्या विकासाला याचा मोठा फायदा होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com