BJP News : पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असल्याचे महापालिका निवडणूक निकालानंतर पुन्हा एकदा स्पष्ट झाले. याच मतदारसंघाने लोकसभेच्या निवडणुकीत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना तारले होते. आता या मतदारसंघातून 28 पैकी भाजपचे 25 नगरसेवक निवडून आले आहेत. पूर्व नागपूरमध्ये केलेल्या भरघोस विकासकामांमुळे निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांनी नितीन गडकरी यांचे 25 पुष्पकमळ भेट देऊन आभार व्यक्त केले. पण हे फक्त कृतज्ञतेतून केलेले आभार प्रदर्शन होते की भविष्यातील फिल्डिंग अशी चर्चा रंगली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत गडकरी यांना पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाने सर्वाधिक मताधिक्य दिले होते. येथून त्यांनी सुमारे 80 हजार मतांची आघाडी होती. याच विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी विजयाचा चौकार मारला आहे. विधानसभेच्या निवणुकीत विदर्भातून विक्रमी मतांनी निवडून येण्याचा मान त्यांनी मिळवला.
खोपडे यांनी घेतलेल्या मताधिक्यांच्या निम्मी मतेही काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला घेता आली नाही. या मतदारसंघावर दावा करणाऱ्या काँग्रेसचा फक्त एकच नगरसेवक निवडून आला आहे. पूर्व नागपूर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे या मतदारसंघावर प्राबल्य होते. त्यावेळी सर्वाधिक अविकसित आणि झोपडपट्ट्यांचा मतदारसंघ अशी ओखळ पूर्व नागपूरची होती.
आज सर्वाधिक विकसित मतदारसंघामध्ये पूर्वचा समावेश झाला आहे. 16 वर्षांपूर्वी नगरसेवक एवढीच ओळख असलेल्या आमदार कृष्णा खोपडे यांनी चतुर्वेदी यांचा बालेकिल्ला कायमचा उध्वस्त केला. पहिल्या पराभवानंतर चतुर्वेदी यांनी पुन्हा या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची हिंमत झाली नाही. काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी, पुरुषोत्तम हजारे त्यानंतर राष्ट्रवादीचे दुनेश्वर पेठे असे प्रयोग करून बघितले. मात्र कोणालाच खोपडे यांचा किल्ला भेदता आला नाही.
पूर्व नागपूरचे चित्र पालटण्यात सर्वाधिक मोठा वाटा गडकरी यांच्यासह पाठपुरावा करणारे आमदार खोपडे यांचा आहे. खोपडे यांनी फाईल टाकली की ती गडकरी यांच्याकडून ती लगेच मंजूर होते. त्यामुळे पूर्व नागपूरमध्ये सिमेंट रोड आणि उड्डाणपुल विकासांचा ओव्हडजोड सुरू असल्याचे गमतीने म्हटले जाते. गडकरी हेसुद्धा आपल्या भाषणात आता आमरादाच्या घरातून उड्डाणपूल टाकणे एवढेच बाकी राहिले असल्याचे सांगतात. मतदारसंघाचे चित्र बदलल्याने फळही आता भाजपला भेटत आहे. आमदार खोडपे यांच्या नेतृत्वात भाजपच्या निवडून आलेल्या 25 नगरसेवकांनी कमळपुष्प देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये बंटी कुकडे, बाल्या बोरकर, प्रदीप पोहाणे, सरिता कावरे, दिव्या धुरडे, मनिषा अतकरे, दीपक वाडीभस्मे, अभिरुची राजगिरे, रामदास शाहू, संजय अवचट, रामभाऊ आंबुलकर, चेतना निमजे, उमा देशमुख, बाल्या रारोकर, सौ.संतोष लढ्ढा,अर्चना पडोळे, अरुण हारोडे, दुर्गेश्वरी कोसरे, राजू दिवटे, महेश्वरी बिसेन, शितल रारोकर, सीमा ढोमणे, शारदा बारई, पिंटू गिऱ्हे, ॲड. निलेश गायधने, रजनी वानखेडे, नीता ठाकरे, शेषराव गोतमारे यांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.