Nitin Gadkari News : नितीन गडकरी कसा हाताळणार मोदींच्या विरोधातील जनमानसातला असंतोष?

Nagpur : खासदार म्हणून लोकांची पसंती नितीन गडकरींनाच आहे.
Nitin Gadkari
Nitin Gadkari Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur's MP Nitin Gadkari News : मागील काही काळापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जनमानसात असंतोष खदखदत असल्याचे जाणवत आहे. पण नागपूरचे खासदार म्हणून लोकांची पसंती नितीन गडकरींनाच आहे. पण जनतेच्या नाराजीचा फटका बसण्याचीही काळजी गडकरींना असल्याचे दिसते आहे. (Gadkari also seems to be worried about getting hit)

दोन दिवसांपूर्वी वाढदिवसाला शुभेच्छा देणाऱ्यांच्या कुटुंबीयांनी जरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मतदान केले तरी ते नागपूर लोकसभा मतदारसंघातून आरामात निवडून येऊ शकतात, असे बोलले जाते. सकाळी सात वाजतापासून शुभेच्छा देण्यासाठी झालेली गर्दी रात्री अकरा वाजेपर्यंत ओसरली नव्हती. यात फक्त भाजपचेच नव्हे तर जमसामान्यांचाही मोठ्‍या प्रमाणात समावेश होता. शुभेच्छुकांमध्ये काही काँग्रेसचे नेतेही होते. यावरून त्यांची लोकप्रियता दिसून येते.

नागपूरमधून गडकरी यांच्या विरोधात कोण लढणार, हा प्रश्नही काँग्रेससमोर आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हिंमत दाखवली होती. पराभूत झाल्यानंतर पटोले पुन्हा आपल्या गावी परतले. त्यांनी नागपूरमधून आता लढणार नाही, असे जाहीर केल्याचे कळते. त्यामुळे काँग्रेसची सक्षम उमेदवार शोधण्यासाठी चांगलीच दमछाक होऊ शकते. दुसऱ्या फळीतील काही उमेदवार दिसत असले तरी गटबाजीमध्ये त्यांना उमेदवारी मिळेलच याची शाश्वती नाही.

प्रचंड विकास, कामे, भरघोस कार्यक्रम देणारे गडकरी हे एकमेव खासदार असावे. ते सातत्याने विविध कार्यक्रम आणि जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून आपल्या मतदारांच्या संपर्कात असतात. केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रचंड व्याप असला तरी आठवड्याचे दोन दिवस ते नागपूरला असतात. शहराचा पाणीपुरवठा असो वा गटारनाल्याची समस्या ते याचीही ते गंभीरपणे दखल घेतात.

Nitin Gadkari
Nitin Gadkari Birthday : कामातून देशभर छाप पाडणाऱ्या गडकरींचा 'असा' आहे राजकीय प्रवास

कामांची टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना ते खास आपल्या स्टाईलने धारेवर धरतात. त्यामुळे गडकरी यांची साधी बैठकही गाजते. अधिकारी बैठकीला येताना हबकून असतात. एवढा दरारा त्यांचा प्रशासनात आहे. नागपूर शहराचे रुपडे पालटण्यात गडकरी यांचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी रस्ते प्रशस्त करणे सुरू केले. केंद्रात गेल्यानंतर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचा सपाटा लावला.

मेट्रो रेल्वेला विक्रमी वेळेत धावण्यास भाग पडले. शहरातील उड्डाणपूले आता मोजण्यासाठी बोटांचा वापर करावा लागतो. अपंगांना साहित्य वाटप करून ते घरोघरी पोहोचले आहे. क्रीडा असो व सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी सर्वांना आपलेसे केले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या आग्रहस्तावर त्यांनी त्यांच्यासाठी खासदार महोत्सव सुरू केला आहे.

Nitin Gadkari
Nitin Gadkari On Contractor News : कंत्राटदारांनो काम व्यवस्थीत करा, नाहीतर कारवाई पक्की समजा..

एवढे सारे केल्यानंतरही मागील निवडणुकीत (Election) मतांचा टक्का कमी झाल्याची खंत त्यांना आहे. मोदी सरकारच्या नाराजीचा फटका बसण्याची भीती त्यांना जाणवत आहे. खासदार म्हणून लोकांची पसंती गडकरी यांना आहे. मात्र मोदी (Narendra Modi) यांची धोरणे आणि निर्णयाच्या विरोधात जनमानसात प्रचंड असंतोष खदखदत आहे. हे गडकरी कसे हाताळतात यावरच त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

अजनी प्रकल्पाचे काय?

अजनी प्रकल्पाच्या माध्यमातून नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना शहराचा कायापालट करायचा होता. मात्र यामुळे झाडांची मोठ्‍या प्रमाणात कत्तल करावी लागत असल्याने हा प्रकल्प रेंगाळला आहे. पर्यावरणप्रेमींसोबत गडकरी यांच्या राजकीय मित्रांचाही या प्रकल्पाला विरोध आहे. मात्र गडकरी शांत बसणाऱ्यांपैकी नाही. ते नक्कीच काही तर तोडगा काढून हा प्रकल्प पूर्ण करतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com