Nitin Gadkari : भाजपसाठी प्रचार केला, तर लोक गोटे मारत; पण आता....

BJP News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितली पक्षाची सद्य:स्थिती
Nitin Gadkari.
Nitin Gadkari.Sarkarnama
Published on
Updated on

Nitin Gadkari : भाजप आता जगातील सर्वांत मोठ्या राजकीय पक्षांपैकी एक बनला आहे. परंतु पक्षाची स्थिती सुरुवातीपासूनच अशी होती असे नाही. भाजपचे नागपुरातील दिग्गज नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपध्ये कार्य करताना पूर्वीपासून आलेले अनुभव नागपूरकरांसोबत ‘शेअर’ केले. नागपुरात आयोजित सुमतीताई सुकळीकर स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आजच्या घडीला भाजप देशात सर्वांत मोठा आणि प्रचंड राजकीय ताकद असलेला राजकीय पक्ष बनला आहे. परंतु आधी असे नव्हते, असे गडकरींनी सांगितले.

एक काळ असा होता की, भाजपच्या प्रचाराला आपण निघायचो. भाजपचा कार्यकर्ता आहे सांगितल्यावर तेव्हा लोक गोटे मारत असायचे. पण आज एक काळ असाही आला आहे की, ज्या काँग्रेसच्या लोकांनी भाजप कार्यकर्त्यांच्या घरांवर तेव्हा हल्ले केले, तेच लोक आता आपला सत्कार करीत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाजपचे विदर्भातील सर्वांत ज्येष्ठ व जुने नेते आहेत. एक काळ असा होता की, भाजपची सुरुवात होती आणि नितीन गडकरी हे कार्यकर्ता म्हणून पक्षात काम करीत होते. त्यावेळी आलेल्या अनुभवांना गडकरी यांची शब्दरूपाने वाट मोकळी करून दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nitin Gadkari.
Nitin Gadkari : पत्रकारांना जाहिराती कशा मिळतील? नितीन गडकरींनी सांगितला फंडा !

गडकरी म्हणाले, आपण उमेदीच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या प्रचारासाठी ‘लाउड स्पीकर’ घेऊन घराबाहेर पडायचो. दिवसभर पक्षाच्या प्रचारासाठी काम करायचो. घराबाहेर निघायचो तेव्हा लोक आम्हाला ऐकण्यापेक्षा गोटे मारायचे. आम्हाला प्रचार करण्यापासून रोखायचे. कधीकधी तर प्रश्न पडायचा की काम करावे तरी कसे? आज मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. त्या काळात जेव्हा इंदिरा गांधींना अटक झाली, तेव्हा अनेक भाजप कार्यकर्त्यांच्या घरांवर हल्ले झालेत. त्यावेळी आपण नागपुरातील महाल भागात वास्तव्यास होतो. इंदिया गांधी यांना अटक झाल्यानंतर आपल्याही घरावर हल्ला झाल्याचा अनुभव नितीन गडकरींनी सांगितला.

पक्षाचे काम करताना एक अनुभव असाही आला की, नागपुरातील नंदनवन येथे काम करीत असताना काहींनी हातातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ध्वज हिसकावून घेतला. ध्वजाचा अपमान केला. सोबत असलेल्या स्वयंसेवकांचाही अपमान केला. एक सुखद अनुभवही या वेळी गडकरींनी उपस्थिताना सांगितला. केशवराव शेंडे यांनी त्यांच्या महाविद्यालयात बोलावून घेतले. स्पष्टपणे सांगितले की, आपण जरी काँग्रेसचे असलो आणि गडकरी संघाचे असले त्यांनी आपला आवडता नेता म्हणून सत्कार करीत गळ्यात हार घातला. हा क्षण सुखद होता, असे गडकरी म्हणाले.

Edited By : Prasannaa Jakate

R

Nitin Gadkari.
नितीन गडकरींनी थेट आयुक्तांनाच दिले आदेश, पण का ? | Nitin Gadkari On Government Officer

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com