BJP Politics : गडकरींचा पीए ठेवणार BJP मंत्र्यांच्या 'कारभारा'वर लक्ष; कार्यकर्त्यांच्या मंत्र्यालयातील चकरा थांबणार

Nitin Gadkari PA Sudhir Deulgaonkar : सत्तेत आल्यानंतर नेते विचारत नाहीत, कामे केली जात नाहीत आणि मंत्री आलीशान गाडीतून खाली उतरत नाहीत, अशा अनेक तक्रारी भाजप कार्यकर्त्यांच्या होत्या. निवडणुकीच्या काळात भाजपच्या नेत्यांना आलीशान गाड्या घेऊन प्रचारात फिरू नका, असेही निर्देशही वरिष्ठांकडून देण्यात आले होते.
Nitin Gadkari, Devendra Fadnavis
Nitin Gadkari, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 22 Jan : सत्तेत आल्यानंतर नेते विचारत नाहीत, कामे केली जात नाहीत आणि मंत्री आलीशान गाडीतून खाली उतरत नाहीत, अशा अनेक तक्रारी भाजप कार्यकर्त्यांच्या होत्या. निवडणुकीच्या काळात भाजपच्या (BJP) नेत्यांना आलीशान गाड्या घेऊन प्रचारात फिरू नका, असेही निर्देशही वरिष्ठांकडून देण्यात आले होते.

याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतल्याचे दिसत आहे. आता प्रत्येक मंत्र्यांकडे पक्षाच्यावतीने एक स्वीय सहाय्यक नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या सहाय्यकांमध्ये समन्वय साधण्यासाठी सुधीर देऊळगावकर यांची मुख्य समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Nitin Gadkari, Devendra Fadnavis
Krishna Andhale : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेबाबत पोलिसांचा मोठा निर्णय

सुधीर देऊळगावकर यांची ओळख केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे पीए अशी होती. गडकरी विधान परिषदेचे आमदार होते तेव्हापासून ते त्यांच्यासोबत होते. झटपट काम करून मोकळे होणे ही त्यांची हातोटी आहे. मध्यंतरी आपला व्यवसाय सांभाळण्यासाठी त्यांनी तीन वर्षे ब्रेक घेतला होता.

मात्र, त्यांची उपयुक्तता बघून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पुन्हा भाजपमध्ये त्यांना सक्रिय केले होते. नंतर पुन्हा गडकरी यांनी त्यांना बोलावून घेतले. आता त्यांच्याकडे पक्षसंघटन, शासकीय कामकाज आणि मंत्र्यांच्या सहाय्यकांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबादारी पक्षाने सोपविली आहे. देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री होते. राज्यात आणि केंद्रात सत्ता होती. त्यामुळे 2019 मध्ये पुन्हा भाजप पुन्हा सत्तेवर येणार असेच चित्र दिसत होते.

Nitin Gadkari, Devendra Fadnavis
Radhakrishna Vikhe Patil : वाळू तस्करांची पाठराखण केल्याची विखे पाटलांनी दिली कबुली; म्हणाले, "मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं होतं की..."

असे असले तरी भाजपला सत्तेसाठी लागणार आकडा गाठता आला नव्हता. या दरम्यान कार्यकर्त्यांमध्येही मोठा रोष दिसत होता. राज्यात सत्ता आणि मंत्री भाजपचे असताना कामे होत नाही अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची सार्वत्रिक तक्रार होती. अनेक मंत्र्यांबाबतही नाराजी होती. निवडणुकीच्या वेळी भाजपला कार्यकर्ते आठवतात, आदेश काढून कामाला जुंपतात. मात्र, सत्ता आल्यानंतर कोणी विचारत नाही अशी भावनाही व्यक्त केली जात होती.

त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आता पक्षानेच पुढाकार घेतला आहे. भाजपच्या मंत्र्यांसाठी एक स्वीय सहायक पक्षाच्या कामासाठी नियुक्त केला जाणार आहे. राज्यभरातील कार्यकर्ते मंत्र्याकडे असलेल्या विभागात काही काम असल्यास सहाय्यकाशी संपर्क साधावा लागले. मंत्र्यांच्या सहाय्यकांची नावे भाजपच्या प्रदेश कार्यालयाच्या फलकावर लिहली जाणार आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्या आता मतदारसंघातील विकास कामांसाठी मंत्रालयात चकरा माराव्या लागणार नाहीत. भाजप कार्यालयातूनच त्यांची कामे केली जाणार.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com