Nitin Gadkari News : गडकरींनी ठेकेदारांना भरला सज्जड दम; तर तुमच्यावरही बुलडोजर चालवणार!

Nagpur News : अनेकदा नेत्यांना त्यांच्या मुलांच्या रोजगाराची चिंता असते
Nitin Gadkari News :
Nitin Gadkari News : Sarkarnama

Nitin Gadkari Speech : आपल्या भाषणामंधून नेहमी आपल्या कामांबद्दल आणि रस्त्यांच्या विकासावर बोलणारे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आपल्याच नेत्यांचे कान टोचले आहेत. याचवेळी त्यांनी ठेकेदारांवरही निशाणा साधत, जर कामचुकारपणा केला तर लक्षात ठेवा, असा सज्जड दमही त्यांनी भरला आहे. नागपूरमध्ये आयोजित एका कर्याक्रमात केलेल्या त्यांच्या भाषणाची चर्चा सुरू झाली आहे.

“ मी चार-पाच दिवस नागपूरमध्ये फिरणार आहे. पोलीस लाईन ते काटोल नाक्यापर्यंत उड्डाण पुलाचे काम सुरू होत आहे. डीपीआर झाला आहे, हा उड्डाणपूल लवकच बनेलस २४०० कोटी रुपयांचा नागनदी प्रकल्पासाठी मंजूर झाला आहे. जायकामध्ये याला फायनान्स मिळाला आहे. मी आयुक्तांना म्हटलं आहे की, यात नागपूरचा कन्सलटंट घेऊ नका इथले ठेकेदारही चालू आहेत. जे काम करतात तेही खराब करतात, त्यामुळे या पुढे खराब काम कराल तर त्याला ब्लॅक लिस्ट करून टाकणार, जो गुणवत्तापूर्ण काम करणार नाही त्याच्यावर कारवाई करा, आम्ही काय लक्ष्मी दर्शन नाही केल, त्यामुळे ठेकेदारांनीही लक्षात ठेवावं, त्यामुळे तुम्ही खराब काम केलं तर तुमच्यावरही बुलडोजर चालणार. अशा शब्दांत गडकरींनी ठेकेदारांना इशाराच दिला आहे.

Nitin Gadkari News :
Amit Shah on Vision of Co-operation : अमित शहांनी सांगितलं सहकार खात्याचं व्हिजन ; बँकांना मोठे अधिकार.

गडकरी म्हणाले, अनेकदा नेत्यांना त्यांच्या मुलांच्या रोजगाराची चिंता असते. माझ्या पत्नीला तिकीट द्या. माझ्या मुलाला तिकीट द्या, माझ्या चमचाला तिकीट द्या. ड्रायव्हरला तिकीट द्या. त्यापलीकडे त्यांच्याकडे कुणाचे नावच नसते. फार फार तर माझ्या जातीतल्या एखाद्या माणसाला तिकीट देण्याची मागणी करतात, पण आम्ही असा निर्णय घेतला आहे की, आपल्या मुलांची नाही तर.तुमच्या मुलांची काळजी करायची आहे.जगभरातील फार मोठ्या कंपन्या मिहानमध्ये आल्या असून आतापर्यंत नागपूरमधील 68 हजार लोकांना यामाध्यमातून रोजगार मिळाला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com