Nitin Raut : नितीन राऊतांचा अनोखा दौरा; थेट आयुक्तांनाच नागपूरची दुर्दशा दाखवली

Uttar Nagpur Vidhan Sabha : लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर नागपूरने काँग्रेसला सर्वाधिक मताधिक्य दिले आहे. बसपाचा ग्राफही घरसला आहे. त्यामुळे राऊत उत्साहात आहेत.
Nitin Raut
Nitin RautSarkarnama

राजेश चरपे

Nagpur Political News : महापालिकेचे अधिकारी उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाकडे दुर्लक्ष करतात. विकासकामांना रोखून ठेवतात. कार्यादेश झाल्यानंतरही चालढकल करतात, असा आरोप उत्तर नागपूरचे आमदार तसेच माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला. यानंतर त्यांनी नागपूर महापालिका आयुक्त तसेच प्रशासक अभिजीत चौधरी यांनाच सोबत घेऊन मतदारसंघाचा दौरा केला.

लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर नागपूरने काँग्रेसला सर्वाधिक मताधिक्य दिले आहे. बसपाचा ग्राफही घरसला आहे. त्यामुळे राऊत उत्साहात आहेत. विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने ते कामाला लागले आहेत. निवडणुकीपूर्वी महत्त्वाचे कामे उरकण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात राऊत Nitin Raut सातत्याने निवडून येत आहेत. 2014 च्या निवडणुकीत भाजपच्या मिलिंद माने यांनी त्यांना पराभवाचा धक्का दिला होता. या विजयात बसपा मोठा वाटा होता. मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन झाल्याने राऊतांना पराभवला सामोरे जावे लागले. याची भरपाई त्यांनी पुढील निवडणुकीत केली. भाजपकडे त्यांना तोडीस तोड उत्तर देणार उमेदवार नाही. ही त्यांची सध्या जमेची बाजू आहे.

डॉ. राऊत यांनी महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासोबत उत्तर नागपुरातील विविध भागात जाऊन विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. महापालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. कामे सुरू करण्यासाठी वर्कआर्डरही देण्यात आल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नसल्याने डॉ. राऊत यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

Nitin Raut
Suryakanta Patil Left BJP : भाजपात उलथापालथ सुरू; रावसाहेब दानवे जाताच सूर्यकांता पाटील यांचा भाजपला रामराम

राऊत आणि आयुक्तांनी कडबी चौक ते टेका नाका रस्त्याची पाहणी व कामठीकडे जाणारा रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर ते तथागत चौकापर्यंत सिमेंट रस्ता, कामगार नगर चौक ते टायर चौकापर्यंत रोडची पाहणी केली. वैशालीनगर येथील राजीव गांधी तरणताल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान तसेच बिनाकी तलावाच्या सौंदर्यीकरण कामाची पाहणी करून आयुक्तांना आवश्यक सूचना केल्या.

मनपाकडे उद्यानांचा कारभार गेल्यानंतर उद्यानांची रयाच गेली. रस्त्यांची कामे, ड्रेनेज दुरुस्ती, स्वच्छता या समस्या सोडवण्यात मनपाला अपयश आले असल्याचे राऊत यांचा आरोप आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Nitin Raut
Maratha Kranti Morcha On Bhujbal : 'भुजबळांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करा, अन्यथा..' ; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com