Praful Patel : प्रफुल पटेलांचा इशारा कोणाला; ‘कुणी स्वतःला बाहुबली समजू नका; आम्ही अनेक बाहुबली निवडून आणलेत’

Local Body Election 2025 : प्रफुल पटेल यांनी आपल्या मित्रपक्षाला सूचक इशारा दिल्याचे मानले जात आहे. लोकांशी संवाद साधावा आणि मजबूत उमेदवारांवर भर द्यावा, असा संदेश त्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
Praful Patel
Praful Patel Sarkarnama
Published on
Updated on
  1. बिहार विजयाच्या उत्साहात भाजप अनेक नगरपालिकांत स्वबळावर लढत असून, मित्रपक्षांच्या नेत्यांना तोडत स्वतंत्र आघाड्या तयार करत असल्याचे दिसत आहे.

  2. भंडाऱ्यात प्रफुल पटेल यांनी नाव न घेता भाजपला सूचक इशारा दिला, की राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम असून इतरांनीच त्यांची चिंता करावी.

  3. पटेल यांनी सांगितले की निवडणूक पैसे जिंकवत नाही, मेहनत आणि जनसंपर्कच निर्णायक असतात; महायुतीत राहूनही राष्ट्रवादी आपले स्वतंत्र अस्तित्व राखते.

Bhandara, 16 November : बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते सध्या आक्रमक मूडमध्ये आहेत. बिहारच्या निकालापूर्वीच भाजपने राज्यातील अनेक नगरपालिकांमध्ये स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक ठिकाणी मित्रपक्षाच्या नेत्यांना फोडून त्यांच्यासमोरच आव्हान उभे केले जात आहे. मात्र, महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याने आता नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानेच नाव न घेता भाजपला सुनावल्याचे मानले जात आहे.

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छूक उमेदवारांना मार्गदर्शन करताना माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी मित्रपक्ष भाजपला इशारा दिल्याचे मानले जात आहे. आता भाजपकडून त्यावर काय प्रतिक्रिया येते, हे पाहावे लागणार आहे.

आपण निवडणूक जिंकण्यासाठी सक्षम आहेत. इतरांना आपली चिंता करावी लागेल, आपल्याला इतरांची चिंता करण्यापेक्षा कोणी समजू नका की कोणी बाहुबली आहे म्हणून ते निवडून येणार आहेत. कुणी काय आहेत. किती बाहुबली लोकांना आम्ही मागच्या काळात निवडून दिलं आहे, हे आम्हाला माहिती आहे, असा सूचक इशारा प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी दिल्याचे मानले जात आहे.

प्रफुल पटेल म्हणाले, निवडणुकीत पैसे लागतात, ते एक माध्यम आहे. पण पैशामुळे निवडणूक जिंकून आलो आहे, असं वाटत असेल तर तसं होत नाही. आपण सक्षम आहोत. इतरांना आपली चिंता करावी लागेल, समझनेवाले को इशारा काफी है, असे म्हणत माजी केंद्रीय मंत्री पटेल यांनी नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भाने आपल्या मित्रपक्षाला अंगावर घेतल्याचे मानले जात आहे.

Praful Patel
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना पुन्हा डिवचले; ‘मी डॉक्टर नाही; पण राजकीय ऑपरेशन सहजपणे करतो’

नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान मिळविण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागेल. त्यासाठी जनतेच्या घराघरापर्यंत जाण्याचे नियोजन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी करावे. घरी बसून मतदान होत नाही, त्यासाठी मेहनत करावी लागेल, असा सल्लाही पटेलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिला.

आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिव-शाहु-फुले- आंबेडकर यांच्या विचारधारेने चालणारा पक्ष आहे. त्यामुळे महायुतीमध्ये राहून राष्ट्रवादी काँग्रेसने आपले स्वतंत्र अस्तित्व राखलेले आहे. आगामी निवडणुकीत यश मिळविण्यासाठी आपल्या सर्वांनी अधिकची मेहनत घ्यावी लागेल, असेही त्यांनी पक्षाच्या पदधिकाऱ्यांना सांगितले.

Praful Patel
Nishant Kumar : 9 वेळा मुख्यमंत्री झालेल्या नितीश कुमारांचा मुलगा काय करतो?

1. प्रफुल पटेल यांनी कोणाला सूचक इशारा दिला?

नाव न घेता त्यांनी मित्रपक्ष भाजपला इशारा दिल्याचे मानले जाते.

2. भाजपचा सध्या कोणता राजकीय मोड दिसत आहे?

बिहार विजयामुळे पक्ष आक्रमक असून अनेक नगरपालिकांत स्वबळावर लढत आहे.

3. पटेल यांचे निवडणुकीतील पैशांबाबत मत काय आहे?

पैसे माध्यम असले तरी फक्त पैशांवर निवडणूक जिंकत नाही, खरी ताकद आणि मेहनत महत्वाची.

4. राष्ट्रवादी काँग्रेसने कोणती भूमिका स्पष्ट केली?

महायुतीत असूनही पक्ष आपले स्वतंत्र अस्तित्व व विचारधारा टिकवून ठेवतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com