Bhandara : एका कार्यक्रमात सभापतीनं पैसे उधळले, दुसऱ्यात मुलीला पूर्ण विवस्त्र नाचवले

Police in Action : बीड गावातील मंडईत सभापतींचं नृत्य, नाकाडोंगरीत पाच जणांविरुद्ध गुन्हा
Panchyat Samiti Chairman Dancing in Mandai at Bhandara District.
Panchyat Samiti Chairman Dancing in Mandai at Bhandara District.Sarkarnama
Published on
Updated on

Mandai Dance Program : भंडारा जिल्ह्यात दिवाळीनंतर भरणाऱ्या मंडई नावाच्या मनोरंजनपर कार्यक्रमांमध्ये अश्लीलता वाढीस लागली आहे. असेच दोन व्हिडिओ व्हायरल झाल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली. मोहाडी तालुक्यातील बीड या गावात मंडईच्या कार्यक्रमात पंचायत समिती सभापतीनं नाचणाऱ्या मुलींवर पैसे उधळले, तर तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथील मंडईत तरुणीला विवस्त्र करून नाचविण्यात आलं. नाकाडोंगरीतील प्रकारामुळं पोलिसांनी आयोजकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात मंडई दरवर्षी होतात. हा एक प्रकारचा आनंद मेळावाच असतो. यात कुठे झाडीपट्टी बोलीभाषेतील नाटक आयोजित केले जातात, कुठे नृत्य कार्यक्रम होतात तर कुठे लावणी. मात्र, गेल्या काही दिवसांत मंडईमध्ये अश्लीलतेचा शिरकाव झाल्याची टीका होत आहे. असेच दोन व्हिडिओ मंगळवारी (ता. २१) तुफान व्हायल झालेत. (Latest Marathi News)

Panchyat Samiti Chairman Dancing in Mandai at Bhandara District.
Bhandara News : अजितदादांच्या भाषणात घोषणाबाजी करणाऱ्याला मुख्यमंत्र्यांनी बोलावून घेतलं

मोहाडी तालुक्यातील बीड गावात मंडईसाठी डान्स हंगामा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात तरुणी नृत्य करीत होत्या. या तरुणींवर मोहाडी पंचायत समितीचे सभापती रितेश वासनिक यांनी नोटा उधळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. वासनिक हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी आहेत. वासनिक यांच्या पक्षातील नेते गौतमी पाटीलवर अश्लील नृत्यासाठी टीका करीत असताना हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे. तालुक्यात वासनिक यांची प्रतिमा अत्यंत स्वच्छ नेता म्हणून आहे. अशात त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.

यासंदर्भात ‘सरकारनामा’शी बोलताना वासनिक म्हणाले की, नृत्य करणाऱ्यांचे कौतुक करण्यासाठी आपण त्यांच्या हातात पैसे दिले. आपण विवाह किंवा एखाद्या समारंभात चांगले नृत्य करणाऱ्यावर पैसे ओवाळत वादकाला देतो, तशाच पद्धतीनं ते दिले. यात चुकीचे काहीच नाही. हा मनोरंजनाचा व खासगी विषय असल्याचं ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाकाडोंगरीत अश्लील नृत्य

तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथ शनिवारी (ता. १८) डान्स हंगामाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी नागपूर येथून आर. के. डान्स हंगामा पार्टीच्या नृत्यांगनांना यासाठी बोलावण्यात आलं होतं. रात्री डान्स हंगामाचा कार्यक्रम सुरू झाला. मध्यरात्री दोननंतर कार्यक्रमाला अश्लीलतेचा रंग चढला. डान्स हंगामात नृत्य करणारी तरुणी क्षणातच विवस्त्र झाली. त्यानंतर तिच्यासोबत असलेल्या तरुणाने तरुणीसोबत भर व्यासपीठावर अश्लील कृत्यही केले.

नृत्यादरम्यान हा सर्व प्रकार सुरू असताना तरुणाईची प्रचंड गर्दी होती. जसजशी तरुणी विवस्त्र होत होती, तसतसे उपस्थित प्रेक्षक या जोडप्याला आरडाओरडा करीत प्रतिसाद देत होते. सुमारे पाऊण तास हे नृत्य सुरू होतं आणि तरुणाई त्याचा व्हिडिओ शूट करीत होती. मंडई उत्सवानंतर हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यानं मोठी खळबळ उडाली. पोलिसांच्या हाती हा व्हिडिओ लागल्यानंतर त्यांनी कारवाईला सुरुवात केली.

Panchyat Samiti Chairman Dancing in Mandai at Bhandara District.
Bhandara News : गोसीखुर्द प्रकल्पाबद्दल अजितदादांनी बोलणं सुरू करताच घोषणाबाजीचा ‘प्रहार’

या प्रकरणाची गंभीर दखल घेत भंडारा पोलिसांनी कार्यक्रमाचे आयोजक किशोर मणिराम गौपाले (रा. नाकाडोंगरी, जि. भंडारा), आर. के. डान्स ग्रुप नागपूरचे संचालक राम आहाके (रा. नागपूर), आर.के. डान्स ग्रुप नागपूरमधील तरुण-तरुणी, तसेच व्हिडिओ क्लिप प्रसारमाध्यमांना देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गोबरवाही पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकारामुळं भंडारा जिल्ह्यात दिवाळीनंतर गावागावांमध्ये होणाऱ्या मंडई उत्सवाला गालबोट लागले आहे. अनेक ठिकाणी अद्यापही मंडईचे कार्यक्रम सुरू असून, परराज्यातून नृत्यांगना तरुणींना आणले जात आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Panchyat Samiti Chairman Dancing in Mandai at Bhandara District.
Bhandara News : एकनाथ शिंदे विरोधाला न जुमानता काम करताहेत, अजितदादांनी केली पाठराखण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com