OBC Kranti Morcha : भंडाऱ्यात येणाऱ्या उद्योगमंत्र्यांना ओबीसी क्रांती मोर्चा काळे झेंडे दाखवणार !

Bhandara : भंडारा पोलीस विभागासह जिल्हा प्रशासनाचे पुन्हा टेंशन वाढले आहे.
Uday Samant and Sanjay Mate
Uday Samant and Sanjay MateSarkarnama

Bhandara OBC Kranti Morcha News : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे आज (ता. १०) भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी उद्योगमंत्र्यांना ओबीसी क्रांती मोर्चाच्या रोषाला सामोरे लावे लागण्याची शक्यता आहे. कारण मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवण्याची तयारी केली आहे. (The tension between the district administration and the Bhandara police department has increased again.)

शिंदे-फडणवीस-पवार सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करत कुणबी समाजाचे दाखले देण्याची भूमिका आहे. याविरोधात भंडाऱ्यात येणाऱ्या मंत्री उदय सावंत यांना ओबीसी क्रांती मोर्चा त्यांना काळे झेंडे दाखवत आपला रोष व्यक्त करणार आहे, अशी माहिती ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना दिली.

विशेष म्हणजे मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण दिल्यास वैनगंगा नदीत उडी घेऊन सामूहिक आत्महत्या करू, असा इशारा ओबीसी क्रांती मोर्चाकडून याआधीच देण्यात आला आहे. या संघटनेने शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या विरोधात एलगार पुकारल्याचे दिसत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा पेटलेला वाद सध्या तरी मिटेल, असे दिसत नाही. आजच्या इशाऱ्याने भंडारा पोलीस विभागासह जिल्हा प्रशासनाचे पुन्हा टेंशन वाढले आहे.

मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून मराठा नेते मनोज जरांगे यांनी जालन्यात आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांची खालावत चाललेली प्रकृती व मराठ्यांच्या सुटत असलेला संयम पाहता सरकारवर अधिक दबाव वाढत चालता आहे. मनोज जरांगे यांचे उपोषण सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. पण त्यात यश येताना दिसत नाही.दरम्यान मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी केल्यानंतर ओबीसी पेटून उठला आहे.

Uday Samant and Sanjay Mate
Bhandara-Gondia News : ‘सारस’ करणार अवैध धंद्यांची पोलखोल, मुनगंटीवारांच्या ट्विटनंतर सुरू झाली चर्चा !

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी या निर्णयाला आधीच विरोध केला आहे. आता यामध्ये भंडारा (Bhandara) ओबीसी क्रांती मोर्चाने उडी घेतली. मराठा समाजाला ओबीसीत त्यातही कुणबी समाजात समाविष्ट केल्यास सर्व ओबीसी (OBC) क्रांती मोर्चाचे पदाधिकारी वैनगंगा नदीत उडी घेऊन सामूहिक आत्महत्या करणार असल्याच्या निर्धार केला होता. यात भर म्हणून की काय आज भंडारा जिल्ह्यात येणाऱ्या उद्योग मंत्री उदय सामंत यांना ओबीसी क्रांती मोर्चा काळे झेंडे दाखविनार आहे.

तिकडे मराठा नेते मनोज जरांगे यांचे सुरू असलेले आमरण उपोषण, इकडे ओबीसी क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक आत्महत्येचा नंतर मंत्राना काळे झेंडे दाखविण्याचा दिलेला इशारा, यामुळे भंडारा जिल्हा प्रशासन आणखी पेचात पडले आहे. यासंदर्भात संजय मते म्हणाले, आधीच ओबीसी प्रवर्गात ४५० जातींचा समावेश आहे. सत्तरी ओलांडली तरी ओबीसी समाजाचा अजून विकास झालेला नाही.

Uday Samant and Sanjay Mate
Bhandara Congress-BJP News : जनसंवाद यात्रा आहे तरी कुणाची? काँग्रेस-भाजपमध्ये रस्सीखेच !

ओबीसी प्रवर्गात आता पुन्हा एका समाजाची भर पडणे ओबीसी समाजाला परवडणारे नाही. शिंदे सरकारला ओबीसी समाजाकडे लक्ष द्यायला वेळ नसताना कोणत्या अधिकाराने ओबीसी समाजात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा घाट घालत आहात, असा परखड सवाल मते यांनी केला. ओबीसींवर आताही अन्याय करणार असाल तर येत्या निवडणुकीत त्याची किंमत सत्ताधाऱ्यांना मोजावी लागेल, असेही ते म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com