OBC Representatives At Mumbai : ओबीसींच्या प्रतिनिधींची उद्या मुंबईत बैठक; पण कुणबी कृती समितीचा बहिष्कार !

Nagpur Dr. Babanrao Taywade : चर्चेअंती उपोषण सुरू ठेवायचे किंवा नाही याचा निर्णय घेण्यात येईल, असे बबनराव तायवाडे यांनी सांगितले.
OBC Representatives
OBC RepresentativesSarkarnama
Published on
Updated on

Nagpur OBC Political News : ओबीसी आरक्षणासाठी अठरा दिवसांपासून साखळी उपोषणाला बसलेले राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि विविध ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी आज (ता. २८) मुंबईला रवाना होणार आहेत. ओबीसी समाजाच्या सुमारे पन्नास प्रतिनिधींना राज्य शासनाने चर्चेला बोलावले आहे. (After the discussion, a decision will be taken whether to continue the fast or not)

शुक्रवारी, २९ सप्टेंबरला सह्याद्री अतिथिगृहात दुपारी २ वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ओबीसी खात्याचे मंत्री अतुल सावे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. बैठकीला मोजके प्रतिनिधी जाणार असून, संविधान चौकातील साखळी उपोषण सुरूच ठेवण्यात येणार आहे.

राज्य शासनासोबतच्या चर्चेअंती उपोषण सुरू ठेवायचे किंवा नाही याचा निर्णय घेण्यात येईल, असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सांगितले. बुधवारी अठराव्या दिवशी गणेश नाखले, महेंद्र उईके, गेमराज गोमासे, शरद वानखेडे, दौलत शास्त्री, माया घोरपडे, पल्लवी मेश्राम, केशव शास्त्री, त्रिलोकचंद व्यवहारे, परमेश्वर राऊत, प्रा. रमेश पिसे, कल्पना मानकर, सुधाकर तायवाडे, उदय देशमुख, हेमंत गावंडे, डॉ. अरुण वराडे, अविनाश घागरे उपोषणाला बसले होते.

मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये, तसेच त्यांचा ओबीसींमध्ये समावेश करण्यात येऊ नये, याकरिता सर्वप्रथम सर्व शाखीय कुणबी समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते. दहाव्या दिवशी सर्व ओबीसी संघटना आणि सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा सहभाग असलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला होता. त्यानंतर ओबीसी महासंघाने हे आंदोलन पुढे सुरू ठेवले. जोपर्यंत राज्य शासन लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार महासंघाने केला आहे.

फक्त भाजपचेच आजी-माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांना निमंत्रितांमध्ये स्थान देण्यात आल्याने राज्य शासनाने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात मुंबई येथे बोलावण्यात आलेल्या बैठकीवर सर्व शाखीय कुणबी ओबीसी आंदोलन समितीने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. ही बैठक शुक्रवारी होणार आहे.

दोन दिवसांपूर्वी समितीच्या वतीने चर्चेसाठी बोलावण्यात आलेल्या निमंत्रितांमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री तसेच सावनेरचे आमदार सुनील केदार, माजी गृहमंत्री तसेच काटोलचे आमदार अनिल देशमुख यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांचा समावेश करण्याची मागणी केली होती.

Edited By : Atul Mehere

OBC Representatives
Chandrapur OBC Andolan: सर्वपक्षीय ओबीसींची बैठक घ्या; ताकत कळेल, असं का म्हणाले वडेट्टीवार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com