Vijay Wadettiwar attack : ओबीसी उपसमिती हे लॉलीपॉप; वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर हल्लाबोल

OBC reservation issue News : ओबीसी समाजाची ज्यांना ज्यांना चिंता आहे त्या सर्वांनी आपला पक्ष बाहेर ठेवून या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केला.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : महायुती सरकारने हैदराबाद गॅझेटचा शासना आदेश काढून सर्व मराठा समाजाला ओबीसीत आणण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे. तेव्हापासून मोठ्या प्रमाणात ओबीसीत घुसखोरी सुरू झाली आहे. त्यामुळे ओबीसीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ओबीसी रोष कमी करण्यासाठी उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र हे सरकारचे सोंग आहे. ओबीसी समाजाला लॉलीपॉप दाखवला जात असल्याचा थेट आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या शासनादेशाच्या विरोधात 10 ऑक्टोबरला नागपूरमध्ये सकल ओबीसी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ही ओबीसी समाजाच्या अस्तित्वाची लढाई आहे. ‘करो या मरो'च्या या लढाईत जे सामील होतील त्यांचे स्वागत आहे. ओबीसी समाजाची ज्यांना ज्यांना चिंता आहे त्या सर्वांनी आपला पक्ष बाहेर ठेवून या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केला.

या जीआरच्या माध्यमातून भाजपला (BJP) संपूर्ण आरक्षणच संपवायचे आहे. समाजा-समाजात भांडणे लावायची, आपसात वाद निर्माण करायचा असा महायुती सरकारचा हेतू आहे. मराठा समाजाला दिलेले आरक्षण याच षडयंत्राचा एक भाग आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर ओबीसी समाजाचा रोष शमवण्यासाठी मंत्र्यांचा समावेश असलेली ओबीसी उपसमिती स्थापन केली. या समितीत सर्व सरकारचेच प्रतिनिधी आहेत. त्यांना आपले मंत्रिपद टिकावायचे आहे. त्यामुळे कोणी विरोध करणार नाही.

काही थातूरमातूर मागण्या मान्य करून वेळ मारून नेली जात आहे. आधी शासनादेश काढून मराठ्यांना ओबीसी समाजात घुसवण्यात आले. त्यावर ही समिती काय करणार असा सवालही वडेट्टीवार यांनी केला. जो माझा डीएनए ओबीसी आहे, असा दावा करतो त्यानेच ओबीसीचा घात केला, असा आरोपही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.

मराठा समाजाला कुणबी समाजाचे जात प्रमाणपत्र देण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे. दिवसाला हजार प्रमाणपत्रांचे वाटप केले जात आहे. जो बैलपोळा साजरा करतो, ज्याचे कुलदैवत तुळजाभवानी आहे असे तकलादू प्रश्नांचा फॉर्म यासाठी भरावा लागतो. महाराष्ट्रात सर्वच जातीचे लोक बैलपोळा साजरा करतात आणि निम्म्या लोकांचे कुलदैवत तुळजाभवानी आहे. त्या सर्वांचा समावेश ओबीसीत करणार का? असा सवाल वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी सरकारला केला.

हा काळा जीआर आहे. तो रद्द करावा. तोपर्यंत ओबीसी स्वस्थ बसणार नाही. ही निर्वाणीची लढाई आहे. या सरकारला येत्या निवडणुकांमध्ये ओबीसी त्यांची जागा दाखवून देईल, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला. यावेळी शरद पवार राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, प्रवीण कुंटे पाटील, काँग्रेसचे हुकमचंद आमधरे, ज्ञानेश्वर वाकुडकर आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com