Buldhana : भाजपमधील अंतर्गत वाद भोवला; 23 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल

BJP Clash : तालुकाध्यक्ष निवडीवरून 3 डिसेंबरला झाला होता मेहकरमध्ये जबरदस्त राडा
BJP
BJPGoogle
Published on
Updated on

Police In Action : तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर सर्वत्र जल्लोष होत असताना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरात भाजपमधीलच दोन गट भिडले होते. यात विधानसभा प्रमुखासह तिघांना मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी आता भाजपाच्या 23 पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याविरुद्ध मेहकर पोलिसांनी गंभीर स्वरूपाच्या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

देशातील तीन राज्यात भाजपने सत्ता काबीज केल्याचा आनंदोत्सव साजरा होत होता. दुसरीकडे मेहकरात मात्र याउलट घडलं. अंतर्गत वाद विकोपाला गेल्याने दोन गट एकमेकांवर भिडले. यावेळी झालेल्या जबर मारहाणीत काहीजण जखमीही झाले.

BJP
Buldhana : एकीकडे भाजपचा जल्लोष, दुसरीकडं पक्षाच्या दोन गटांत तुफान राडा

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे विधानसभा संपर्क प्रमुख प्रकाश गवई यांच्या कार्यालयात होणाऱ्या पत्रकार परिषदेपूर्वी प्रल्हाद अन्ना लष्कर आणि शिव ठाकरे यांच्यासह 20 ते 25 लोकांनी प्रकाश गवई आणि अर्जुन वानखेडे, सारंग माळेकर यांच्यावर हल्ला चढवला. हल्ला करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण केली. तालुकाध्यक्ष पदाच्या नियुक्तीवरून हा वाद झाल्याची माहिती आहे. एकाच तालुक्यात दोन अध्यक्षांची निवड झाल्यानंतर वादाला सुरुवात झाली. प्रकाश गवई यांच्या कार्यालयात घुसल्यानंतर दुसऱ्या गटातील पदाधिकाऱ्यांनी त्यांना शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर त्याची एकाने पदाधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. त्यामुळे वाद आणखी चिघळला. त्यानंतर कार्यालयात जमलेल्या 20 ते 25 जण आपसात भिडले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकमेकांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली. कार्यालयात घुसलेल्या दुसऱ्या गटातील भाजप पदाधिकाऱ्यांनी हाती जे सापडले त्यानं मारहाण केली. हा प्रकार सुरू असताना याचे व्हिडिओ शूट करण्यात आले. या राड्याचे व्हिडिओ ही सोशल माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. याप्रकरणी पक्षाकडून सहा जणांना निलंबित करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करण्यात आल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष यांनी काल उशिरा ही कारवाई केली आहे. मेहकर विधानसभा प्रमुख प्रकाश गवई यांनी स्वतः पोलिसांत तक्रार दिली आहे. यावरून मेहकर पोलिसांनी सोमवारी 23 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांमध्ये प्रल्हाद लष्कर, विलास लष्कर, प्रदीप इलग, चंद्रकांत अडेलकर, रोहित शेळके, शुभम खंदारकर, गोपाळ देशमुख, दीपक निकस, अक्षद दीक्षित, सीताराम ठोकळ, चेतन भांडेकर, महावीर मंजुळकर, गजू मंजुळकर, बालवीर मंजुळकर, आकाश पीटकर, सुमित शिंदे, ओम पीटकर, जयकांत शिक्रे, रवी शिंदे, आकाश मोहिते, सोनू गुंजकर, शंकर गायकवाड यांचा समावेश आहे. फिर्यादी गवई यांनी नवनियुक्त तालुकाध्यक्ष सारंग माळेकर, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन वानखडे हे भाजप संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेसाठी बसले होते. त्यावेळी वरील लोकांनी कार्यालयात घुसून लोखंडी सळई, लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत साहित्यांची मोडतोड केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Edited by : Prasannaa Jakate

BJP
BJP News : मोठी बातमी! बुलडाण्यातील राडा भोवला; भाजपचे 6 पदाधिकारी निलंबित

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com