Officer in Lakhni Panchayat Samiti Bhandara.
Officer in Lakhni Panchayat Samiti Bhandara.Sarkarnama

Bhandara News : पटोलेंपुढं हजेरीच्या धास्तीनं अधिकाऱ्याला बैठकीत भोवळ

Nana Patole : भंडारा येथील लाखनी पंचायत समितीची आमसभा ठरली वादळी
Published on

Lakhni Panchayat Samiti News : भंडारा जिल्ह्यातील लाखनी पंचायत समिती सभागृह. पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आमसभा सुरू असते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले (MLA Nana Patole) पंचायत समिती सदस्यांच्या तक्रार ऐकत एक एक करीत अधिकाऱ्यांना फैलावर घेत असतात. अशात आपला नंबर लागतो की काय, या धास्तीनं सभेदरम्यान एका अधिकाऱ्याला भोवळ येते.

लाखनी येथील पंचायत समितीत बुधवारी (ता. 23) घडलेल्या या प्रकारामुळं प्रशासनात वर्तुळात खळबळ उडते व ‘नानांचा’ किती दरारा आहे, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगते. (Officer Of Lakhni Panchayat Samiti Of Bhandara District Staggered During Meeting of Congress MLA Nana Patole)

Officer in Lakhni Panchayat Samiti Bhandara.
Bhandara News : ‘पनौती’ शब्दावरून भाजप आपलंच हसू करून घेतेय

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले हे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. आपल्या विधानसभा मतदारसंघातील लाखनी पंचायत समितीच्या आमसभेला त्यांनी हजेरी लावली. या वेळी उपस्थित सरपंच आणि नागरिकांनी अधिकाऱ्यांचा हेकेखोरीच्या तक्रारीचा पाढाच वाचला. लाखनी पंचायत समिती कार्यालयात कामे होत नाहीत, कोण कामं रोखतो, फायली कशा टेबलावर पडून राहतात यांची तक्रार करण्यात आली.

ज्या ज्या अधिकाऱ्याचं नाव सदस्य आणि नागरीत घेत होते, त्या त्या अधिकाऱ्याची झाडाझडती आमदार पटोले घेत होते. अशात आपलाही नंबर लागतो की काय या धास्तीनं महाराष्ट्र रोजगार हमीच्या तांत्रिक अधिकाऱ्याला भोवळ आली. अधिकारी खुर्चीवरून खाली कोसळले. त्यामुळं सभागृहात खळबळ उडाली. आमसभेच्या ठिकाणी तैनात असलेल्या डॉक्टर भोवळ आलेल्या अधिकाऱ्याच्या मदतीला धावले. काही वेळातच संबंधित अधिकाऱ्याची प्रकृती ठीक झाली व सभेला पुन्हा सुरुवात झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भंडारा जिल्ह्यात एकूण सात पंचायत समिती आहेत. भंडारा, लाखंदूर, लाखनी, मोहाडी, पवनी, साकोली, तुमसर पंचायत समितीचा त्यात समावेश आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषदेत काँग्रेसचं संख्याबळ बऱ्यापैकी आहे. जिल्ह्यात आमदार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या नात्यानं नाना पटोले यांचं वर्चस्व आहे. पटोले हेदेखील जिल्हा परिषदेच्या राजकारणातून विधानसभा व लोकसभेपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे ग्रामीण पातळीवरील राजकारण व कामाचा त्यांना चांगला अनुभव आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावरही पटोले यांनी अद्यापही आपली पकड कायम ठेवली आहे. अशात स्थानिक लोकप्रतिनिधींच्या तक्रारी आल्यानंतर अधिकाऱ्यांना कसं हाताळायचं या आपल्या अनुभवाचा ते पुरेपूर वापर करीत आहेत. पटोले यांच्या या अनुभवाचा फायदाही भंडाऱ्यात काँग्रेसला होत आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Officer in Lakhni Panchayat Samiti Bhandara.
Sarkarnama Impact : नाकाडोंगरीतील डान्सप्रकरणी ‘पीआय’ ‘कंट्रोल रूम अटॅच’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com