Shinde Government News : शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट ; 'नियमित कर्ज फेडणाऱ्या..'

Shinde Government News : या निर्णयामुळे सरकारवर 4700 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे.
Shinde Government news update
Shinde Government news updatesarkarnama
Published on
Updated on

Shinde Government News : शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde Government) शेतकऱ्यांना गुड न्यूज दिली आहे. शेतकरी कर्जमुक्ती (farmer debt) योजनेसाठी 700 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंतच्या प्रोत्साहन पर लाभासाठी राज्य सरकारकडून 700 कोटींचा निधीची तरतूद करण्यात आली आहे.

राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आणि याच योजनेअंतर्गत नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Shinde Government news update
Nawab Malik News : भाजप नेत्याकडून मलिकांचा 'फर्जीवाडा' उघड ; 'एका महिलेला..'

याआधी 2900 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली असुन आता 700 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सरकारवर 4700 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोनामुळे निधी रखडला होता. तो निधी आता शिंदे-फडणवीस सरकारने मंजूर करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

Shinde Government news update
Telangana News : विरोधकांची मोठ बांधायला सुरुवात ; काँग्रेस वगळून तिसऱ्या मोर्चासाठी..
  • 4700 कोटी रुपयांपैकी 2 हजार 350 कोटी रुपये अनुदान स्वरूप शेतकऱ्यांना 16 सप्टेंबर 2022 पर्यंतच मिळाले आहेत.

  • शेतकऱ्यांना 18 ऑक्टोबर 2022 रोजी 650 कोटी वितरित केल्याचं सांगितलं जात आहे.

  • यापूर्वी 2 हजार 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

  • आता एकूण 4 हजार 700 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार राज्याच्या तिजोरीवर पडला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com