Old Pension : ‘जुनी पेन्शन’ने सरकारचे टेन्शन तर वाढवलेच, आता विद्यार्थ्यांनाही आले ‘हे’ टेन्शन !

Teachers : शिक्षक संघटना बेमुदत संपात सहभागी झाल्या आहेत.
Old Pension Scheme
Old Pension SchemeSarkarnama

The involvement of teachers in the strikes is significant : १८८२ची जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्यभरातील कर्मचारी, शिक्षक आजपासून संपावर गेले आहेत. संपकऱ्यांमध्ये शिक्षकांचा सहभाग लक्षणीय आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात निघालेला मोर्चा सरकारची धडकी भरवणारा ठरला होता. आजपासून कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप केल्यामुळे सरकारचे टेन्शन वाढले आहे.

सध्या राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. दोन्ही सभागृहात हा मुद्दा चांगलाच तापत आहे. विधानपरिषदेत जुनी पेन्शनच्या मागणीनंतर काही काळ सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले होते. जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह इतर अनेक मागण्यांसाठी राज्यातील सर्वच शिक्षक संघटना बेमुदत संपात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे सर्व सेवा ठप्प होण्याची चिन्हे आहेत.

बोर्डाचे दहावी आणि बारावीचे पेपर प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन पेपरच्या वेळी विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढणार आहे. राज्यातील जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. त्यामुळे या संपाचा सर्वाधिक फटका सध्या सुरू असलेल्या दहावी आणि बारावीच्या पेपरवर होण्याची शक्यता आहे. दहावीमध्ये विभागात पावणे दोन लाख तर बारावीत दीड लाखावर विद्यार्थी बसले आहेत. २५ तारखेपर्यंत दहावीचे पेपर घेण्यात येणार असून बारावीचे दोन पेपर घेण्यात येणार आहे.

बोर्डाच्या बहुतांश कामांत शिक्षकांचा समावेश असल्याने पेपर नेऊन देण्यापासून पेपर घेण्यापर्यंत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. अशा वेळी शिक्षकांनी पुकारलेल्या संपाचा फटका विद्यार्थ्यांना (Students) बसण्याची दाट शक्यता आहे. बोर्ड वा विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडून तशी शक्यता नसल्याचे सांगण्यात येत असले तरी, राज्यातील शिक्षकांनी आग्रही भूमिका घेतली असल्याने दहावी आणि बारावीच्या पेपरवर संकटाचे ढग कायम आहेत.

Old Pension Scheme
Old Pension : विधानपरिषदेत पेटला जुनी पेन्शनचा मुद्दा; चर्चा झालीच पाहिजे, म्हणत सदस्य आक्रमक !

महाविद्यालयस्तरावरील परीक्षांवर सावट..

विद्यापीठाच्या (University) परीक्षा सध्या महाविद्यालय स्तरावर सुरू आहेत. विद्यापीठातील कर्मचारी संघटनांसह शिक्षक (Teacher) संघटनांनी संपात सहभागी आहेत. त्यामुळे महाविद्यालय स्तरावरील परीक्षांना त्याचा फटका बसण्याची शक्यता अधिक आहे. राज्यातील (Maharashtra) शिक्षकांची मोठी संघटना असलेल्या एमफुक्टोनेही संपाला पाठिंबा दर्शविला आहे. मात्र, त्यांनी कामबंद आंदोलनात सहभागी नसल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय राज्याच्या समाजकार्य शिक्षकांची संघटना ‘मास्वे’नेही संपाला पाठिंबा दर्शविला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com