Vidarbha Politics : 'फार अकलेचे तारे तोडू नका' ; आरक्षणाच्या प्रश्नावरून बावनकुळेंनी वडेट्टीवारांची अक्कलच काढली !

Vijay Wadettiwar Vs Chandrashekhar Bawankule : "कुणाच्याही आरक्षणावर राज्यात गदा येणार नाही.."
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar Sarkarnama

Nagpur News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकीकडे राज्यभर आंदोलन पेटले असताना, राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे फैरी सुरू झाले आहे. सत्ताधाऱ्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करीत मराठा समाजाला आतापर्यंत आरक्षणासाठी का ताटकळत ठेवले? असा सवाल केला आहे, तर विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांची विविध मुद्द्यांवरून कोंडी करत आहे. अशात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

Vijay Wadettiwar
Sangli NCP News : विट्याचे पाटील जयंतरावांच्या तालुक्यात करणार अजितदादांचा जंगी सत्कार !

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर बावनकुळे यांनी थेट त्यांच्यावर हल्ला करीत ‘कुणीही अकलेचे तारे तोडू नये’, अशा शब्दात त्यांना टोला लगावला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे लागू नये, असाच सरकारचा प्रयत्न असल्याचे बावनकुळे म्हणाले.

कुणाच्याही आरक्षणावर राज्यात गदा येणार नाही, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार प्रयत्नशील आहेत. परंतु दोन समाजात आरक्षणाच्या मुद्द्यावरून तेढ निर्माण होईल, असे काम सरकारला करता येणार नाही. त्यामुळे अभ्यासपूर्ण पद्धतीने व कायद्याच्या चौकटीत टिकेल असे आरक्षण मराठा समाजाला देण्याचे प्रयत्न राज्य सरकार करीत असल्याचे बानवकुळे यांनी सांगितले.

Vijay Wadettiwar
G-20 New Delhi summit : 'नवी दिल्ली लीडर्स घोषणापत्रा'ला मंजुरी; भारताचे महत्त्वपूर्ण पाऊल !

'ओबीसी समाजाला मिळालेले आरक्षण मंडल आयोग व राज्य घटनेप्रमाणे मिळाले आहे. त्यातून कुणालाही वाटा देणे योग्य वाटत नाही. मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक निकषांवर आरक्षण दिले गेले पाहिजे. परंतु वडेट्टीवार यांनी ओबीसीच्या आरक्षणात अमुक बदल करा, असे सल्ले देणे बंद करावे,' असेही बावनकुळे म्हणाले. भारतीय जनता पार्टी मराठा समाजाच्या पाठीशी आहे. त्यांना सर्व कसोट्यांवर टिकेल, असे आरक्षण मिळेल यात शंकाच नाही असेही बानवकुळे यांनी नमूद केले.

Vijay Wadettiwar
Chandrashekhar Bawankule News : बावनकुळे म्हणतात, "इंडिया आघाडी'ची बैठक म्हणजे फुसका बार"

मुनगंटीवारांना डावलण्याचा प्रश्नच नाही -

भाजपाच्या बैठकीतून वरिष्ठ नेते तथा राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना डावलण्यात आल्याचा मुद्दा प्रदेशाध्यक्ष आमदार बावनकुळे यांनी फेटाळून लावला. एका छोट्या बैठकीत काही आमदारांना केवळ बुकलेटचे वाटप करायचे होते. मात्र मुनगंटीवार यांना डावलण्यात आल्याचा अपप्रचार काहींनी चालविला आहे. ही बाब पूर्णत: असत्य असून, पुढील बैठकींना मुनगंटीवार दिसतीलच असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

सरकार विधिज्ञ नेमेल -

नागपुरातील जिल्हा सहकारी बँक घोटाळ्याच्या बाबतीत अधिक बोलणे आमदार बावनकुळे यांनी टाळले. यासंदर्भात विधिज्ञांची नेमणूक करण्याचे काम राज्य सरकार करेल. आपण त्यावर अधिक बोलणे संयुक्तिक होणार नाही, असे नमूद करीत बावनकुळे यांनी या मुद्द्यावर अधिक भाष्य करणे टाळले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com