अधिवेशनात दिशा सालियन प्रकरणाच्या SIT चौकशीची घोषणा; पण धडधड वाढली संजय राठोडांची!

Winter session : दिशा सालियन प्रकरणावरून आज हिवाळी अधिवेशनामध्ये गोंधळ झाला.
Sanjay Rathore, Ajit Pawar
Sanjay Rathore, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Winter session : दिशा सालियन प्रकरणावरून आज हिवाळी अधिवेशनामध्ये गोंधळ झाला. विधानसभा आणि विधानपरिषदेत सत्ताधारी शिंदे गट आणि भाजप विरुद्ध महाविकास आघाडीतील घटक पक्ष असा आरोप-प्रत्यारोपांचा सामना पहायला मिळाला. आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) घेरण्याचा प्रयत्न भाजप आणि शिंदे गटाने केला. दिशाच्या प्रकरणावरून विविध प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी शिंदे गट आणि भाजपने (BJP) केली.

याप्रकरणावरून झालेल्या गोंधळामुळे पाचवेळा विधानसभा तहकूब झाली. त्यानंतर शेवटी विधानसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री दवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिशा सालियन प्रकरणामध्ये एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली. त्यावर विरोधी पक्ष नेते आजित पवार (Ajit Pawar) यांनी जोसदार आक्षेप घेत, दिशाच्या आई-वडीलांपासून ते पूजा चव्हाण प्रकरणापर्यंतचा संदर्भ दिला.

Sanjay Rathore, Ajit Pawar
Sushant Singh Rajput case : स्वत: रियानेच सांगितले होते कोण आहे 'AU'! मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल!

दिशा सालियन प्रकरणावरून गृहमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. दिशाच्या तपासाचे प्रकरण मुंबई पोलिसांकडे आहे. याप्रकरणाचे ज्यांच्याकडे पुरावे असतील, त्यांनी द्यावे, असेही ते म्हणाले, यासंदर्भात एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाईल, असे फडणवीस यांनी जाहीर केले.

त्यानंतर अजित पवार यांनी यासंदर्भातील भूमिका मांडताना फडणवीस यांच्याप्रमाणे उपमुख्यमंत्री होतो, अशी आठवण करुन देत या प्रकरणावरुन राजकारण केले जात असल्याचा आरोप केला. तसेच दिशाच्या आई वडिलांनी केलेली संपूर्ण मागणीच पवार यांनी वाचून दाखवली. त्यानंतर पवारांनी शिंदे गटातील आमदार आणि विद्यमान मंत्री संजय राठोड यांच्यासंदर्भातील पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशीही केली पाहिजे असीही मागणी केली. त्यामुळे संजय राडोठ यांचे टेन्शनही काहीशे वाढले आहे.

दिशाच्या आई-वडिलांचे पत्र वाचून दाखवताना अजित पवार म्हणाले, त्या राष्ट्रपती मोहोदयांनाही भेटल्या आहेत. एखादे आई-वडील पोटतिकडीने सांगत आहे. स्वत:च्या पोटचा जीव गमावल्यानंतर सांगत आहे. तिने आत्महत्या केली हे सीबीआयकडून आलेलेले आहे. तसेच पुढे अजित पवार यांनी थेट चौकशी करायची ठरले तर सगळ्याच प्रकरणाची करावी लागेल, अशा इशाराही दिला. असे म्हणत त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणाचा उल्लेख केला.

पूजा चव्हाण प्रकरणासंदर्भातही चौकशी करा, असे पवार म्हणाले. ते एवढ्यावरच थांबले नाही तर, 'जसे फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत तसा मी होतो. आम्हाला पण काही थोडा अधिकार होता, असा टोला त्यांनी लगावला. त्यावेळी आम्ही पण सांगत होतो की याची चौकशी झाली पाहिजे. त्या वेळी हेच मान्यवर विरोधी पक्षामध्ये होते.

Sanjay Rathore, Ajit Pawar
मोठी बातमी : आमदार मुक्ता टिळक यांचे निधन

त्या त्यावेळी कशापद्धतीने सभागृह बंद पाडण्याचा किंवा आरोप-प्रत्यारोपांचा कार्यक्रम झाला हे सगळ्यांनी पाहिले, अशा शब्दांत अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले. चौकशा करायच्या असल्या तर सगळ्यांच्याच चौकशा कराव्या लागतील, असे पवार यांनी सांगितले. चौकशी बंद झाली असली तरी रिओपन करता येते, असे म्हणत पवारांनी भाजप आणि शिंदे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यामुळे संजय राठोड यांचीच धडधड वाढली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com