Padmakar Valvi Resigned from BJP : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होवू शकतात. या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आली आहे. निवडणूक लढवण्यास इच्छुक असणारे स्वत:च्या पक्षात उमेदवारी मिळत नसल्याचे दिसताच, अन्य पक्षाचा मार्ग स्वीकारताना दिसत आहे. याशिवाय प्रत्येक राजकीय पक्ष स्वत:ची ताकद वाढवण्यासाठी विविध प्रयत्न करत आहेत. या सगळ्या घडामोडीत आता भाजपला नंदूरबारमध्ये एक मोठा बसला आहे. माजी मंत्री आणि भाजप नेते पद्माकर वळवी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
धनगर आरक्षणाबाबत सरकारची भूमिका न पटल्याने वळवी यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच वळवी यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीकाही केली होती. तर आता त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) यांना आपले राजीनामा पत्र पाठवले आहे.
वळवी म्हणाले की, 'मी भाजपची साथ सोडत आहे. राज्यात आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न सुरु आहे. त्यावरून मी माझी सामाजिक आणि आर्थिक भूमिका आदिवासींच्या वतीने मांडली होती. हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. सरकारने याबाबत अद्याप कोणतही भूमिका घेतलेली नाही. मी आदिवासी नेता असून त्यांच्या प्रश्नांवर काम केलं आहे'.
तसेच 'मी अनेकदा आदिवासींच्या प्रश्नांसाठी सरकारशी चर्चा करत आलो आहे. धनगर समाज प्रस्थापित आहे. तो समाज आदिवासींच्या आरक्षणात शिरु इच्छित आहे. सरकारने त्यांना आश्वासन दिलं आहे. त्याचा निषेध म्हणून मी माझ्या पक्षाच्या पदाचा राजीनामा देत आहे', असे वळवी यांनी सांगितले आहे.
राज्यातील आदिवासींचा आक्रमक चेहरा म्हणून पद्माकरक वळवींना ओळखलं जातं. लोकसभेपूर्वी त्यांनी काँग्रेस सोडून भाजप(BJP)मध्ये प्रवेश केला होता. तर विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेतही दिले आहेत. त्यामुळे आता वळवी कोणत्या पक्षात प्रवेश करतात की घरवापसी करत काँग्रेसमध्ये जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.