Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेच्या 'या' आवाहनावरून नवा वाद उफाळणार?

Vishwa Hindu Parishad on Garba : विश्व हिंदू परिषदेने गरबा उत्सव आयोजन करणाऱ्या मंडळांना संपर्क साधून तशी व्यवस्था करण्यास सांगितले आहे
Vishwa Hindu Parishad on Garba
Vishwa Hindu Parishad on GarbaSarkarnama
Published on
Updated on

Vishwa Hindu Parishad New Demand on Garba : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विश्व हिंदू परिषदेच्या आवाहनावरून नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतर्फे याचे राजकीय भांडवल केल्यास भाजपला नव्या अडचणींना समोरे जावे लागू शकते.

कारण, विश्व हिंदू परिषदेने 'लव्ह जिहाद' रोखण्यासाठी गरब्यात प्रवेश देताना आधार कार्ड तपासा, डोक्यावर टीळा लावा आणि इतर धर्मीयांना रोखा असे सांगून गरज भासल्यास मंडळांना मनुष्यबळ पुरवण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

विश्व हिंदू परिषदेचे(Vishwa Hindu Parishad) महाराष्ट्र आणि गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी थेट गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे. गरबा हा श्रद्धेचा आणि भक्तीचा विषय आहे. फक्त नृत्य नाही आणि इव्हेंटही नाही. त्यामुळे गरबा आयोजनाच्या स्थळी देवीबद्दल श्रद्धा नसलेल्या, भक्ती नसलेल्यांना प्रवेशच करू देण्यात येऊ. तिथे फक्त हिंदू धर्मीयांनी प्रवेश देण्यात यावा. गरबा उत्सवात श्रद्धा नसताना, देवी बद्दल भक्ती नसताना ही अनेक इतर धर्मीय तिथे प्रवेश घेतात आणि हिंदू महिला आणि तरुणींची छेड काढतात. पुढे लव्ह जिहाद सारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे गरबा आयोजन करणाऱ्या मंडळांनी आधीच काळजी घ्यावी असे गोविंद शेंडे म्हणाले.

Vishwa Hindu Parishad on Garba
Ajit Pawar and bjp in Ahmednagar : अजितदादाच्या भिडूचं टेन्शन वाढलं?, नगरच्या उमेदवारीसाठी भाजपनं लढवली 'शक्कल'!

विश्व हिंदू परिषदेने गरबा उत्सव आयोजन करणाऱ्या मंडळांना संपर्क साधून तशी व्यवस्था करण्यास सांगितले आहे. गरबा(Garba) उत्सवात येणाऱ्यांचे आधार कार्ड तपासणे आणि दारावरील व्यवस्थेसाठी आयोजन मंडळांकडे कार्यकर्ते नसल्यास विहिंप आपले कार्यकर्ते मदतीसाठी उपलब्ध करून देण्याचीही तयारी दर्शवली आहे.

Vishwa Hindu Parishad on Garba
Shivneri Sundari : आता 'ST'च्या 'शिवनेरी'त प्रवाशांना असणार "शिवनेरी सुंदरी"ची साथ!

गेल्या काही वर्षांपासून गरबा उत्सवात फक्त हिंदू धर्मीयांनाच प्रवेश देण्यात यावा अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून केली जात आहे. गरब्याच्या कार्यक्रमात इतर धर्मीय लोक प्रवेश करतात आणि त्यामुळे लव्ह जिहाद प्रकरणे घडतात असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांचा आहे. खासकरून गुजरातमध्ये अनेक ठिकाणी गरबा आयोजकांकडून फक्त हिंदूंना या ठिकाणी प्रवेश देण्यात येतो. इतर धर्मीयांना विरोध केला जातो. त्यामुळे या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. हे लक्षात घेऊन विश्व हिंदू परिषदेने प्रवेश द्वारावरच इतर धर्मीयांना रोखण्यासाठी कार्यकर्ते पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.

(Edited by- mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com