Vidarbha State : स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनात तरुणाईचा सहभाग वाढतोय यामुळे..

Protest : नागपुरातील रास्तो रोको आंदोलन सांगून गेले बरेच काही; ग्रामीण तरुणांना भावनिक साद
Protest For Vidarbha State.
Protest For Vidarbha State.Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur : स्वतंत्र विदर्भाची मागणी नवीन नाही. गेल्या सुमारे 100 वर्षांपासून ही मागणी कायम आहे. विदर्भासाठी असलेले आंदोलन अधुनमधुन डोके वर काढत राहाते. अशात नागपूरसह चंद्रपूर, बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या आंदोलनात तरुणाईचा सहभाग वाढत आहे. सोमवारी (ता. 1) नागपूर येथील संविधान चौकात करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनात बरेच नवे चेहरे दिसले. हे चेहरे तरुणांचे होते. हे चेहरे फारसे प्रसिद्ध नसले तरी या प्रदेशातील तरुणांना नेमके काय हवे आहे, हे ते सांगून गेले.

वीज, पाणी, कोळसा, राजकीय पाठिंबा, नैसर्गिक साधन संपत्ती असे सर्व काही असतानाही विदर्भाचा अनुशेष आजही पूर्णपणे भरून निघालेला नाही. उपराजधानीत विकासगंगा पोहोचली. परंतु या गंगेचा प्रवाह आजही पूर्व विदर्भात गडचिरोलीपर्यंत आणि पश्चिमेत बुलढाण्यापर्यंत पूर्णपणे पोहोचलेला नाही. अशातच विदर्भवाद्यांनी वेगळ्या राज्य का हवे, हे मुद्दे पटवून देण्यासाठी सुरू केलेला प्रचार तरुणाईला पटत आहे. त्यातूनच यंदाच्या विदर्भवादी आंदोलनात तरूणाईचा सहभाग वाढत आहे.

Protest For Vidarbha State.
Nagpur : सरकारने नियुक्त्या करताना विचार करावा... असं का म्हणाले वडेट्टीवार?

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने गेल्या सहा दिवसांपासून नागपुरातील संविधान चौकात उपोषण सुरू केले. सोमवारी आंदोलनाची सांगता झाली आणि यावेळी झालेल्या सभेनंतर विदर्भवाद्यांनी संविधान चौकात रस्त्यावर येऊन ठिय्या आंदोलन केले. आंदोलकांनी पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतु गेल्या अनेक वर्षातील आंदोलनापेक्षा यंदाचे चित्र वेगळे होते. या आंदोलनात यंदा तरुण चेहऱ्यांची संख्या जास्त होती.

विदर्भात सर्वत्र सध्या आंदोलनकर्ते या प्रदेशातील जिल्ह्यांवर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचत आहेत. आर्थिक, आरोग्य आणि नोकरी यातील अनुशेष कोणतेही सरकार आले तरी भरून काढू शकत नाही. ते आता शक्यही दिसत नाही. विदर्भात वनसंपदा, खनिज संपत्ती, सुपिक जमीन आणि वीज निर्मितीमध्ये श्रीमंत आहे. पण, विदर्भात सिंचनाच्या सोयी नाही आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. विदर्भात कोणतेही मोठे उद्योग नाहीत. नागपूर, अमरावती ही दोन शहरे वगळली तर अत्याधुनिक शिक्षणाच्या सोयी-सुविधा नाहीत. त्यामुळे शिक्षण व नोकरीसाठी पुणे-मुंबईत जाण्याशिवाय कसा पर्याय राहात नाही, हे आंदोलक पटवून देत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुणे, मुंबई येथे शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने विदर्भातील मुले जातात. इकडे त्यांचे शेतकरी आईवडिल पोटाला चिमटा देत उन्हातान्हात राबतात आणि मुलांना पैसे पाठवितात. तिकडे पुणे-मुंबईत मुले शिक्षण-नोकरीसाठी एका एका खोलीत तीन ते चार जण राहून दिवस काढतात, अशा भावनिक मुद्द्यांना यंदा हात घालण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांची मुलेही विदर्भाच्या आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे, अशी चर्चा आता करू लागले आहेत. त्यातूनच यंदाच्या आंदोलनात तरुणाईचा सहभाग वाढला आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Protest For Vidarbha State.
Nagpur Protest : ट्रकचालकांच्या आंदोलनामुळे विदर्भात अफवाच अफवा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com