Patole On Maratha Reservation : खोट्या जाहिराती लावत किमान मराठ्यांना फसवू तर नका, नानांनी फटकारले !

Maharashtra Government : सरकार मराठा समाजाला कदापि आरक्षण देणार नाही.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News : जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, अशा जाहिराती देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार मराठा समाजाची फसवणूक करत आहेत. (Government will never give reservation to Maratha community)

सरकार मराठा समाजाला कदापि आरक्षण देणार नाही. अशात किमान खोटी जाहिरातबाजी करून मराठा समाजाची फसवणूक तर करू नका, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी सरकारला फटकारले. देवेंद्र फडणवीस सांगतात, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वचन दिले आहे, तर त्या पद्धतीने आरक्षण द्यायला पाहिजे. सरकारला कोणी रोखलंय. एकीकडे ओबीसी समाजाला लिहून द्यायचे आणि दुसरीकडे जाहिरातबाजी करायची, हा सरकारचा दुटप्पीपणा आहे, असे आमदार पटोले म्हणाले. सरकार ओबीसी आणि मराठा समाजाशी खोटं बोलली आहे. एक खोटं लपवण्यासाठी आता सरकारला अनेक वेळा खोटे बोलावे लागत आहे, असंही ते म्हणाले.

५० टक्के आरक्षण हा राज्याचा नसून केंद्राचा विषय आहे. केंद्र सरकारचं काउंटडाउन सुरू झालंय. आता निवडणूक जाहीर होईल. त्यामुळे येणारं अधिवेशन हे भाजप सरकारचा शेवटचं अधिवेशन ठरेल, असा दावा पटोलेंनी केला. केंद्र आणि राज्य सरकारच्या मानसिकतेने जनतेत चीड निर्माण झाली आहे. ज्या लोकांनी तुम्हाला आश्वासनं दिली, त्यांना तुम्ही गावबंदी केली तर त्यात बिघडलं कुठे. लोकशाही आहे लोकांना अधिकार आहे. नेत्यांना गावबंदी करायचा, असं ते म्हणाले.

राहुल गांधी हेच आरक्षण देऊ शकतात. त्यासाठी देशातील व राज्यातील जनतेने काँग्रेसला कौल देणे गरजेचे आहे. राहुल गांधी सत्तेवर आल्यास देशभरातील जातीपातींमधला तिढा सुटेल, असा विश्वास नानांनी व्यक्त केला. मूळ प्रश्न हा आहे की, आरक्षणाची संख्या पाहावी. ओबीसी मध्ये १९ टक्के आरक्षण दिसायला खूप वाटते, पण त्यामध्ये इतर प्रवर्गदेखील आहेत. हे पण बघायला पाहिजे.

भाजप आदिवासीविरोधी आहेत मणिपूर याचं ताजं उदाहरण आहे. हजारो महिलांना पेटवलं, त्यावर मोदी बोलत नाहीत. दलित मागास आणि आदिवासींवर अन्याय कसा करायचा, हे भाजपला माहीत आहे, अशी टीकाही आमदार पटोले यांनी केली. एकनाथ शिंदे माझे चांगले मित्र आहेत. लोकसभा निवडणुका येतील तसा अजित पवार व शिंदे यांचं भाजप काय काय करते हे पुढे पाहू, यापुढे मी काही सांगणार नाही, असे म्हणत नानांनी एकप्रकारे पवार आणि शिंदेंचं भविष्य वर्तवलं.

Nana Patole
Nana Patole News : फडणवीस मुख्यमंत्री असताना विदर्भाचे किती प्रश्न सुटले? पटोलेंनी विचारला जाब

राज्यात कायदा सुव्यवस्था हा विषयच राहिला नाही. केंद्राने आजची परिस्थिती पाहता राष्ट्रपती राजवट लावली असती. लूटपाट आणि संमेलनात हे सरकार व्यस्त आहे. त्यामुळे सामान्यांचं जगणं मुश्कील झालं आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत आले, तर त्याला कोणाचाही विरोध नाही. मात्र, याबाबतचा निर्णय दिल्लीवरून होणार आहे, असे नाना पटेल यांनी नमूद केले.

Edited By : Atul Mehere

Nana Patole
Nana Patole News : पटोलेंनी टायमिंग साधले ; थेट अजित पवारांना पदमुक्त करण्याचीच मागणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com