Pawar Group Aggressive: पडळकरांच्या विरोधात अजित पवार गट आक्रमक, फडणवीसांनीही दिली समज !

Akola Political News: अकोला शहरातील मदनलाल धिंग्रा चौकात आंदोलन करण्यात आले.
Ajit Pawar, Gopichand Padalkar and Devendra Fadanvis
Ajit Pawar, Gopichand Padalkar and Devendra FadanvisSarkarnama

Akola News : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) गट चांगलाच आक्रमक झाला आहे. आमदार अमोल मिटकरी यांच्या नेतृत्वाखाली काल (ता. १८) सायंकाळी अकोला शहरातील मदनलाल धिंग्रा चौकात आंदोलन करण्यात आले. (A protest was held at Madanlal Dhingra Chowk in Akola city)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अतिशय खालच्या स्तरावर जाऊन पडळकर यांनी टीका केली. त्यांच्या या टीकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे गोपीचंद पडळकरांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद ठिकठिकाणी उमटले. अजित पवार यांचे समर्थकांनी अकोल्यातील धिंग्रा चौकात गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आंदोलन करत प्रतिमेला जोडे मारले.

प्रतिमेला पायाखाली तुडवून कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला. तर गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. हे आंदोलन आमदार अमोल मिटकरी, (Amol Mitkari) महानगराध्यक्ष विजय देशमुख, शहर युवक अध्यक्ष अजय मते, ग्रामीण युवक अध्यक्ष राम हिंगणकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

माजी नगरसेवक दिलीप देशमुख, संतोष डाबेराव, बुढन गाडेकर, अशोक परलीकर, सुधीर काहकर, अब्दुल नईम, नितीन क्षीरसागर ,राहुल इंगोले, शुभम सिरसाठ, मोहम्मद फिरोज, आकाश धवसे, शुभम पिठलोड, ताज नौरंगाबादी, आशिष वाधवानी ,अविनाश वाहुरवाघ, प्रकाश खंडारे, वैभव घुगे, अविनाश इंगळे, अजय कांबळे, संदीप कांबळे, गजानन मुरुमकार, युनुस रेघिवाले, नितीन थलकर, आदी आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

आमदार मिटकरींनी दिला होता इशारा..

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोपीचंद पडळकर यांना आवर घाला अन्यथा आम्हाला आवरणे तुमच्यासाठी कठीण होईल, अशा शब्दांत इशारा दिलेला आहे. त्यामुळे आता गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात नवा वाद उफाळला आहे.

आज मुंबई येथील सागर बंगल्यावर श्रीगणेशाची स्थापना केल्यावर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पडळकरांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. सत्तेत सहभागी तिन्ही पक्षांचे नेते, कार्यकर्ते यांनी एकमेकांचा सन्मान केला पाहिजे. पडळकरांनीच काय, कुणीही असे वक्तव्य करू नये, असे म्हणत फडणवीसांनी पडळकरांना समज दिली.

Edited By : Atul Mehere

Ajit Pawar, Gopichand Padalkar and Devendra Fadanvis
Akola MLA News: आमच्या हक्काचे पाणी द्या; आमदार पिंपळेंच्या विरोधात नागरिक रस्त्यावर !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com