Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला स्थगिती देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिका दाखल करणारे अनिल वडपल्लीवार हे माजी मंत्री सुनील केदारांचे कट्टर समर्थक आहे. यावरून भाजपने काँग्रेसला कोंडीत पकडले आहे. लाडकी बहीण योजनेला विरोध करणारा काँग्रेसचा चेहरा पुन्हा उघड झाला असल्याचे भाजपने ट्विट केले आहे.
लाडकी बहीण योजनेला सुरुवातीपासूनच काँग्रेसचा विरोध आहे. यापूर्वी राज्याला कर्जात बुडवून बहिणीला पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता.
विधानसभेच्या निवडणुकीत पराभव दिसत असल्याने लाडकी बहीण योजना आणल्याचा आरोपही केला जात आहे. यापूर्वीसुद्धा लाडकी बहीण योजनेसंदर्भात काँग्रेसने कोर्टात धाव घेतली होती. यावरून काँग्रेसला लाडक्या बहिणीला आर्थिक मदत मिळू द्यायची हे सिद्ध होते. काँग्रेसचा बेगडीपणा यातून उघड झाला असल्याचे प्रदेश भाजपने आपल्या एक्सवरील पोस्टवरून आरोप केला आहे.
सुनील केदार यांनी लाडकी बहीण योजनेविरोधातील अजेंडा याचिकाकर्ते अनिल वडपल्लीवार यांच्या मार्फत राबबत आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेविरोधातील काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला असल्याचे भाजपने म्हटले आहे.
महायुती सरकारचा सर्व फोकस सध्या लाडकी बहीण योजनेवर आहे. विभागनिहाय मेळावे घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या मेळाव्याला उपस्थित राहत आहेत.
नागपूरमध्ये 31 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याकरिता सुमारे एक लाख महिलांना कार्यक्रमाला आणल्या जाणार आहे. यावेळी ज्यांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले अशा काही बहिणींचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची सध्या जय्यत तयारी भाजपच्यावतीने केली जात आहे. याकरिता भाजपच्या बैठका सुरू आहेत.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.