Nana Patole
Nana PatoleSarkarnama

तुम्हीच सांगा नाना भाऊ माझी काय चूक? महिला पदाधिकाऱ्याची आर्त हाक...

या आंदोलनाची दखल इतर कुणी तर सोडाच, त्यांच्या स्वपक्षाने, इतकेच काय खुद्द प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील घेतली नाही.

भंडारा : नाना पटोले यांच्या मतदार संघातच 65 वर्षीय महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत नाना पटोले यांचे सतत दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ही महिला व्यतित झाली आहे. तुम्हीच सांगा नाना भाऊ माझी काय चूक, अशी आर्त हाक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना महिलेने दिली आहे.

सतत होत असलेल्या दुर्लक्षामुळे व्यथित झालेल्या महिलेने नाना पटोलेंकडे (Nana Patole) कैफियत मांडली. या महिला कार्यकर्त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील कनेरी/दगडी ग्रामपंचायतीच्या सदस्य तथा माजी पंचायत समिती सदस्य लता शेंडे आहेत. त्यांचे आपल्या न्याय मागण्यासाठी लाखनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. मात्र लाखनी तहसील प्रशासनाच्या आडमूठ व दंडुकेशाही धोरणामुळे उपोषणाच्या पहिल्याच दिवशी मंडप काढल्याने त्यांना रखरखत्या उन्हात व रात्रीच्या कडाक्याच्या थंडीत उपोषण करावे लागत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या आंदोलनाची दखल इतर कुणी तर सोडाच, त्यांच्या स्वपक्षाने, इतकेच काय खुद्द काॅंग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील घेतली नाही. त्यांमुळे आता न्याय कोणाला मागावा हा प्रश्न लता शेंडे यांना पडला आहे.

लाखनी तालुक्यातील कनेरी दगडी येथे कृषी विभागांतर्गत (आत्माच्या योजनेतून महाडीपी) लिक्विड प्लांट सुरू करण्यात आला. सुगंधित गवतापासून तेल काढण्याची प्रक्रिया करण्यात येथे येते. मात्र या प्रक्रियेदरम्यान उग्र स्वरूपाचा वास आणि धूर निघत असल्यामुळे लोकवस्तीलगत असलेल्या या प्लांटमुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावू लागल्या आहेत. हा प्लांट येथून बंद करून इतरत्र हालवावा, या मागणीसाठी वर्षभरापासून लता शेंडे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र भंडारा प्रशासनाने यावर थातूर मातूर कारवाई केली, पण कायमस्वरूपी तोडगा काढला नाही.

लता शेंडे यांनी लाखनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली. दरम्यान लाखनीचे तहसीलदार महेश शितोळे यांनी उपोषणाची परवानगी दिली नाही, तरीसुद्धा महिला उपोषणाला बसल्याने कार्यालयाच्या पार्किंगला अडचण होत असल्याचा मुद्दा समोर करून या महिलेचा पेंडॉल हटवण्यात आला. सध्या जिल्ह्याचा पारा 40 डिग्री सेल्सिअसच्या वर जाऊ पाहात आहे. रखरखत्या उन्हात लता शेंडे यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे. आता जीव गेला तरी प्रकरण तडीस जाईपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे प्रशासन आता काय भूमिका घेते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. हा विषय कृषी विभागाशी संबंधित असल्याचे कारण देत तहसीलदारांनी आपले हात झटकल्याचे दिसत आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मतदार संघात त्यांच्याच महिला पदाधिकाऱ्याला खुल्या आकाशाखाली व रखरखत्या उन्हात उपोषणावर बसवण्याची वेळ नाकर्त्या प्रशासनामुळे आली आहे.

Nana Patole
Video: संविधानाला छेद देऊन तेढ निर्माण करण्याचे काम भाजप करत आहे :नाना पटोले

नाना पटोलेंचा आक्रमक स्वभाव पाहता हायकमांडने प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी दिली आहे. नाना यात यश मिळविताना दिसत आहेत. त्यांनी महाराष्ट्रात कॉंग्रेसची मूठ घट्ट करण्याचे काम आरंभले आहे. पण भंडारा जिल्ह्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे येथील काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्याचाच परिणाम म्हणून कॉंग्रेसची कार्यकर्ता असलेल्या महिलेवर ही वेळ आली. परंपरागत कॉंग्रेस कार्यकर्त्याचे असे हाल होणे म्हणजे कट्टर पदाधिकाऱ्यांमध्ये चुकीचा चुकीचा संदेश जाणे होय. त्यामुळे महाराष्ट्र काबीज केला, पण स्वजिल्हा सुटला, अशी वेळ यायला नको, म्हणजे झालं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com