Bhandara : अधिकाऱ्याला पैशांचा मोह नडला, अब्रूही गेली अन् नशिबी तुरुंगवासही घडला

Bribe Case : फसवणूक प्रकरणात ग्रामविकास अधिकाऱ्याला अखेर अटक; लाखांदूर पोलिसांची कारवाई
GramPanchayat Chaprad Office.
GramPanchayat Chaprad Office.Sakarnama
Published on
Updated on

ACB Action : पैशांचा मोह एका ग्रामविकास अधिकाऱ्याला चांगलाच महागात पडला आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील ग्रामपंचायत चप्राड येथील ही घटना आहे. गैरप्रकार उघड झाल्याने या ग्रामविकास अधिकाऱ्याला तुरुंगाची हवा खावी लागली.

ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध विकासकामांचे बनावट बिल करून एकूण 68.96 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य आरोपी असल्याचा ठपका ग्रामविकास अधिकाऱ्यावर आहे. यातील एक आरोपी फरार आहे. एकाला अटकपूर्व जामीन मंजूर आहे. तत्कालीन ग्रामविकास अधिकारी गोपाळकृष्ण लोखंडे (वय 50) असे अटक आरोपीचे नाव आहे.

GramPanchayat Chaprad Office.
Bhandara : तीन लाखांच्या बिलासाठी वेठीस धरले, मग ग्रामसेवकाने अधिकाऱ्यालाच...

गैरप्रकार 2013-14 व 2017-18 या कालावधीतील आहे. लाखांदूर तालुक्यातील चप्राड येथील हा घोटाळा आहे. या प्रकरणात लाखांदूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मार्तंड खुणे यांच्या तक्रारीवरून सहा महिन्यांपूर्वी लाखांदूर पोलिसांनी तत्कालीन सरपंच धनराज ढोरे (वय 47) आणि कुसुम दिघोरे (वय 42) यांच्यासह तत्कालीन ग्रामविकास अधिकारी गोपाळकृष्ण लोखंडे (वय 50) यांच्याविरुद्ध शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला होता.

शासनाच्या तेराव्या आणि चौदाव्या वित्त आयोगांतर्गत चप्राड ग्रामपंचायतीच्या तीन विविध विकासकामांसाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या घटनेतील आरोपींनी ग्रामपंचायत परिसरातील विविध विकासकामांमध्ये बनावट बिलांच्या माध्यमातून या निधीतून लाखो रुपयांचा घोळ केला. ग्रामपंचायत सर्वसाधारण निधी, पाणीपुरवठा योजना कर व इतर करातूनही लाखो रुपयांची अफरातफर त्यांनी केली. याप्रकरणी भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार शासनाच्या विविध योजनांमधून प्राप्त झालेल्या निधीसह स्थानिक चप्राड ग्रामपंचायतीच्या निधीचे लेखापरीक्षण करण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आरोपींनी संगनमताने ग्रामपंचायतीच्या विविध निधीसह शासनाच्या विविध योजनाअंतर्गत 68.96 लाख रुपयांच्या निधीचा अपहार केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. न्यायालयाने कुसुम दिघोरे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. उर्वरित दोन आरोपींचा जामीन फेटाळला होता. याप्रकरणी तब्बल सहा महिन्यांनंतर लाखांदूर पोलिसांनी कारवाई करीत ग्रामविकास अधिकाऱ्याला अटक केली. एका आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपींना 8 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक विलास मुंडे, पोलिस हवालदार सुभाष शहारे करीत आहेत. या घोटाळ्यामुळे जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Edited by : Prasannaa Jakate

GramPanchayat Chaprad Office.
Bhandara : रथयात्रेतून खासदार सुनील मेंढेंचा अश्वमेध महायज्ञ नेमका कशासाठी...?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com