Buldhana : पहाटे एटीएम चोरले सूर्यास्त होण्यापूर्वीच पोलिसांनी चोरट्यांना...

ATM Theft : काही तासातच लावला तपास यंत्रणेने घटनेचा छडा
ATM Thives of Buldhana.
ATM Thives of Buldhana.Sarkarnama
Published on
Updated on

Police Action : पहाटे वाहनाद्वारे एटीएम पळवून नेणाऱ्या चोरट्यांना सायंकाळीच बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अवघ्या काही तासांतच या अजब चोरीचा पर्दाफाश पोलिसांनी केला. चोरट्यांच्या टोळीने चक्क लाखोंच्या रक्कमेसह एटीएमच उचलून नेले होते. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे रविवारी (ता. 7) पहाटे ही घटना घडली. चोरट्यांनी चक्क एटीएमच उचलून नेले होते. त्यामुळे त्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. अवघ्या तासांतच पोलिसांनी टोळीला पकडले.

चोरांनी एटीएम मशीन वाहनाला बांधून उखडले. त्यानंतर एटरएम मशीन चोरट्यांनी मालवाहू वाहनात टाकून पळवून नेले. अजब चोरीची ही घटना उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला. संग्रामपूर शहरातील मुख्य रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडियाचे हे एटीएम मशीनच काढून नेण्यात आल्याने पोलिसांना वेगाने तपास करण्याचे आव्हान होते.

ATM Thives of Buldhana.
Buldhana : केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांच्या कार्यक्रम खासदार जाधवांनी टाळला की...

केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव रविवारी संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथे विकसित भारत संकल्प यात्रेत होते. पोलिस ठाण्यातील अनेक कर्मचारी हे बंदोबस्तात व्यस्त होते. चोरट्यांच्या टोळीने ही संधी साधल्याची चर्चाही जिल्ह्यात होती. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला होता. चोरांच्या टोळीने केलेली ही चोरी अजब फंडा वापरत केली. अफलातून पोलिसांना त्यांनी आवाहनच दिले. चोरीसाठी केंद्रीय मंत्री तालुक्यात असल्याचा आणि पोलिस बंदोबस्तात 'बिझी' असल्याचा मुहूर्त त्यांनी साधला. रकमेसह थेट एटीएम मशीनच चोरून नेल्याने चोरटे फसले. त्यांना वाटले मशीन चोरून नेल्याने आपली चोरी यशस्वी होईल. मात्र झाले उलटेच. या चोरीप्रकरणी काही तासातच दोन आरोपींना एटीएम व त्या वाहनासह पकडण्यात पोलिसांना यश आले आणि चोरीचा हा फंडा फसला.

जालना पोलिसांनी दोन आरोपींना एटीएम मशीन आणि मालवाहू वाहनासह पकडले. घटनेतील तीन आरोपी फरार झालेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. पकडण्यात आलेल्या दोन साथीदारांकडून टोळीतील इतरांची माहिती घेण्यात येत आहे. त्यांनाही लवकरच जेरबंद करण्यात येणार येईल, असे पोलिसांनी सांगितले. दोन आरोपी, एटीएम व वाहन सापडल्याने पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पकडण्यात आलेल्या टोळीवर पूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिस या टोळीच्या मुसक्या आवळण्यासाठी त्यांच्या मागावर होती. दयालसिंग गुलजारसिंग टाक (रा. म्हाडा कॉलनी, टीव्ही सेंटर, जालना), नरसिंग अथरसिंग बावरी (रा. शिक्कलकरी मोहल्ला, मंगळ बाजार, जालना) अशी पकडण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या चोरट्यांना आणण्यासाठी बुलढाण्यातील तामगाव पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

Edited by Prasannaa Jakate

ATM Thives of Buldhana.
Buldhana : यवतमाळच्या प्रकरणात तुपकर भडकले, म्हणाले एवढी मस्ती येतेच कशी?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com