Buldhana : केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांच्या कार्यक्रम खासदार जाधवांनी टाळला की...

Shiv Sena : लोकसभेच्या जागा वाटपावरून बुलढाण्यात सुरू आहे रस्सीखेच
Bhupendra Yadav at Buldhana.
Bhupendra Yadav at Buldhana.Sarkarnama
Published on
Updated on

BJP Program : लोकसभा निवडणुकीच्या जागेवरून सध्या बुलढाण्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. अशात केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांचे मतदार संघातील दौरे कायम आहेत. रविवारी (ता. 7) देखील यादव हे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात असलेल्या बावनबीर येथे आले होत. यादव यांच्या सभेला खासदार प्रतापराव जाधव यांनी टाळले की अन्य काही कारण झाले, अशी चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली.

केंद्रीय कामगार, वन मंत्री भुपेंद्र यादव यांच्या कार्यक्रमाला आमदार आकाश फुंडकर, आमदार श्वेता महाले, जिल्हाधिकारी किरण पाटील, उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, माजी आमदार विजयराज शिंदे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष उमा तायडे आदी उपस्थित होते. शिवसेना एकनाथ शिंदे गट महायुतीत असतानाही या गटातील नेत्यांची मोजकीच उपस्थिती बरेच काही सांगून गेली.

Bhupendra Yadav at Buldhana.
Buldhana : यवतमाळच्या प्रकरणात तुपकर भडकले, म्हणाले एवढी मस्ती येतेच कशी?

बुलढाणा जिल्हा प्रशासनाच्यावतीने विकसित भारत संकल्प यात्रेसाठी या शासकीय कार्यक्रमाचे बावनबीर येथे आयोजन करण्यात आले होत. हा कार्यक्रम राजकीय पक्षाचा नव्हता. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या खासदार, आमदारांना निमंत्रण नव्हेत की काय, अशी चर्चाही कार्यक्रमस्थळावर रंगली. शासकीय कार्यक्रम असल्याने अपेक्षेप्रमाणे भुपेंद्र यादव यांनी केंद्र सरकारने केलेल्या विकास कामांचा आणि राबविलेल्या योजनांवर आधारितच भाषण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने काय काय केले हे त्यांनी सांगितले.

बावनबीर आदिवासीबहुल भाग असल्याने सरकारने आयुष्यमान भारत, किसान क्रेडिट कार्ड, आदिवासी कल्याणाच्या योजना, जात प्रमाणपत्र वितरणाचे सुलभीकरण कसे केले, हे यादव यांनी सांगितले. मात्र या कार्यक्रमाला शिंदे गटातील अनेक नेत्यांनी मारलेली दांडी चर्चेचा विषय ठरली. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील सर्व मतदार संघांमध्ये भाजपने सर्वेक्षण करून घेतले. बुलढाणा मतदार संघातून शिवसेनेचे प्रतापराव जाधव लोकसभेत आहेत. आगामी निवडणुकीत त्यांना चवथ्या क्रमांकाची मते मिळतील असे भाजपच्या सर्वेक्षणात आढळले आहे. त्यामुळे भाजपने या जागेवर दावा केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेना किंवा भाजपने बुलढाणा लोकसभेच्या जागेबाबत अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. मात्र प्रतापराव जाधव यांचा पत्ता कट करण्याला शिवसेना शिंदे गटातून विरोध आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी तर याबाबत अत्यंत स्पष्ट व आक्रमकपणे आपली बाजू मांडली. या सर्व घडामोडी सुरू असताना पक्षाने जबाबदारी दिल्याने भुपेंद्र यादव यांचा बुलढाणा दौरा कायम आहे. लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसे त्यांचे व भाजप नेत्यांच्या दौऱ्यांचे प्रमाण वाढेल व त्यातून शिंदे गटाची नाराजीही, असे सांगण्यात येत आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Bhupendra Yadav at Buldhana.
Lok Sabha Election 2024 : शिंदे गटाची धाकधूक वाढली, भाजप टाकणार डाव

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com