चंद्रपुरात राजकीय नाट्य : वाट पाहूनही पालकमंत्री पोहचलेच नाहीत, धानोरकर संतापले अन् कुदळ मारून गेले!

Chandrapur News : अर्धा-एक तास उशिर समजून शकतो. तीन-चार तासापर्यंत लोकप्रतिनिधींना ताटकळत ठेवले जाते.
Chandrapur News | Sudhir Mungantivar | Balu Dhanorkar
Chandrapur News | Sudhir Mungantivar | Balu DhanorkarSarkarnama

Chandrapur News : चंद्रपुरातील आझाद बाग लोकार्पण सोहळ्यात भाजप पदाधिकाऱ्यांच्या अतिउत्साहामुळे झालेला राडा अजूनही लोकांच्या लक्षात आहे.आज शनिवार (दि.२४ डिसें) जिल्हा क्रीडा संकुल बांधकामाचे लोकार्पण व नव्या कामाच्या भूमिजूनाच्या कार्यक्रमातही नाट्य पाहायला मिळाले. नियोजित वेळी पालकमंत्री कार्यक्रमस्थळी आले नाही. यामुळे तीन तासांपासून वाट बघून वैतालेले खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांनी स्वतःच वॉकिंग ट्रॅकचे भूमिपजन केले आणि निघून गेले. यामुळे तणाव निर्माण झाला. यानंतर एका तासाने पालमकंत्री सुधीर मुनगंटीवार कार्यक्रमस्थळी पोहचले आणि त्यांनी क्रीडा संकुलातील झालेल्या कामांचे लोकापर्ण केले.

Chandrapur News | Sudhir Mungantivar | Balu Dhanorkar
भुमरेंचे टेन्शन वाढणार : आदित्य ठाकरेंचा दौरा फलदायी ठरला; दोन मोठी गावे शिवसेनेने हिसकावली!

जिल्हा क्रीडासंकुलातील सिंथेटीक ट्रॅंक, फुटबाल ग्राऊंड आणि चेंजिंगरुमचे लोकापर्ण आणि वाकींग ट्रॅकचे भूमिपूजन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज सायंकाळी ४.३० वाजता आयोजित केले होते. या कार्यक्रमाच्या पत्रिकेवरूनच वाद होत झाला होता. भाजपने स्वतः कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका छापल्या. यात प्रमुख अतिथी, विशेष अतिथी म्हणून भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नावे होती. शासकीय पत्रिकेत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना स्थान देण्यात आले. भाजपला पत्रिका छापण्याचा अधिकार दिला कुणी? असा सवाल आमदार किशोर जोरगेवार यांनी केला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून कोनशिलेवरचे नाव काढण्याची विनंती केली. आमदार जोरगेवार यांना कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

तत्पूर्वी धानोरकर यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. धानोरकर म्हणाले, सत्ता येते असते आणि जाते. सत्ता कधीच कुणाच्या बापाची असत नाही. पालकमंत्री होतात, येतात आणि जातात. मात्र हा शासनाचा निधी आहे, हा लोकांचा पैसा असतो. या कार्यक्रमाचे भाजपकडून पत्रिका छापल्या जातातच कसे? हा काही भाजपचा कार्यक्रम नाही, याचं कुठेतरी भान ठेवायला हवं. कार्यक्रमाला अर्धा-एक तास उशिर समजून शकतो. तीन-चार तासापर्यंत लोकप्रतिनिधींना ताटकळत ठेवले जाते, हे योग्य नाही. प्रोटोकॉल प्रमाणे कार्यक्रम घ्यायला हवा. आमच्या सारख्या लोकप्रतिधींचा अपमानच करणाचा असेल तर अशा कार्यक्रमांना बोलवताच कशाला, अशा शब्दात धानोरकर यांनी संताप व्यक्त केला.

Chandrapur News | Sudhir Mungantivar | Balu Dhanorkar
Bharat Jodo Yatra : भाजप-संघासोबतच काही मीडियाकडूनही द्वेष पसरवण्याचं काम; राहुल गांधीचा हल्लाबोल!

दुसरीकडे कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अगदी वेळेवर पोहचले. कार्यक्रमाला एक तास उशीर होईल, असे गृहीत धरुन ते आपल्या जिल्हा क्रीडा संकुलाजवळील जनसंपर्क कार्यालयात बसून होते. मात्र तीन तासानंतरही कार्यक्रमस्थळी पालकमंत्री पोहचलेच नाही. दुसरीकडे धानोरकर दाम्पत्यांनी नियोजित कार्यक्रमाचे वेळापत्रक कोलमडले. भाजप व्यतिरिक्त कोणत्याही लोकप्रतिनिधीं कार्यक्रमाला येवू नये, यासाठी जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे. नेहमी असेच केले जाते, असे म्हणत, वैतागून धानोरकर दांम्पत्य कार्यक्रमस्थळी पोहचले आणि त्यांनी वॉकिंग ट्रकचे भूमिपूजन केले.

दरम्यान, यावर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रतिक्रिया दिली. "नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार खासदारांना आहे. माझ्या व्यस्त कार्य़क्रमामुळे उशिर झाला. खासदार सुद्धा अनेक कार्यक्रमात उशीरा जातात. नागपुरात काही माध्यमांचे कार्यक्रम होते. त्यामुळे मलाही उशीर झाला, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com