भुमरेंचे टेन्शन वाढणार : आदित्य ठाकरेंचा दौरा फलदायी ठरला; दोन मोठी गावे शिवसेनेने हिसकावली!

Aditya Thackeray News : नुकत्याच राज्यातील सात हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या.
Sandipan Bhumre, Aditya Thackeray
Sandipan Bhumre, Aditya ThackeraySarkarnama

Aditya Thackeray News : नुकत्याच राज्यातील सात हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या मतदारसंघातील बिडकीन, आडुळ ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सरपंच विजयी झाले आहेत. यामुळे भुमरे यांची डोखेदुखी वाढली असल्याची चर्चा आहे.

आडुळ, बिडकीन ही भुमरे यांच्या दृष्टीने महत्वाची गावे समजली जातात. याच ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाचे सरपंच निवडून आल्याने भुमरेंना हा धक्का मानला जातोय. विशेष म्हणजे राज्यातील सत्तांतरानंतर युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भुमरेंच्या मतदारसंघातील याच बिडकीनमध्ये येवून शिवसंवाद यात्रा आणि सभा घेतली होती. त्याचा परिनामा निकालावर झाल्याची चर्चा आहे.

Sandipan Bhumre, Aditya Thackeray
Grampanchayat Result : आधी दावे, आता सत्कारांसाठी चढाओढ..

त्यावेळी सभेला झालेल्या गर्दीची जोरदार चर्चा झाली होती. आता थेट जनतेतून निवड झालेल्या सरपंच पदावर आडुळ आणि बिडकीन येथे ठाकरे गटाने विजय मिळवला आहे. आडुळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी ठाकरे गटाचे बबन भावले, तर बिडकीन येथे अशोक धर्मे हे विजयी झाले आहेत. बिडकीनमध्ये भुमरे यांच्या गटाचा सरपंच पदाचा उमेदवार बबन ठाणगे हे तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे भुमरेंसाठी ही गोष्ट भविष्यातील निवडणुकीमध्ये डोखेदुखी वाढवण्याची शक्यता आहे.

पैठण विधानसभा मतदारसंघातील आडुळ आणि बिडकीन ही दोन महत्वाची आणि मोठी गावे आहेत. बाजारपेठ असलेल्या या गावाचा कारभार आता ठाकरे गटाकडे गेल्यामुळे भुमरेंना हा धक्का म्हणावा लागेल. दरम्यान, बिडकीन येथे प्रचार संपल्यानंतर भुमरे यांनी शिंदे गटाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करत आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोपही झाला होता. त्यामुळे भुमरे यांनी या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

Sandipan Bhumre, Aditya Thackeray
भारतीयांची रोगप्रतिकारशक्ती चांगली; कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही : आरोग्यमंत्री सावंत

भुमरे यांच्या मतदार संघात आदित्य ठाकरे यांनी सभा झाली होती. तसचे त्यांनी दौराही केला होता. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही प्रबोधन यात्रेच्या माध्यमातून मतदार संघात सभा घेतली होती. त्यामुळे भुमरे यांना घेरण्याची तयारी ठाकरे गटाने केली आहे. दरम्यान, भुमरे यांनी पैठण तालुक्यातील सरपंचाचा सत्कार आयोजित केला होता. यावेळी तालुक्यातील २५ पैकी २० सरपंच आपल्या गटाचे निवडून आल्याचा दावा देखील त्यांनी केला. मात्र, मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या पराभवामुळे भुमरे यांना येणाऱ्या निवडणुकांसाठी अधिक तयारी करावी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com