Maharashtra Politics : महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार, पण ‘या’ घटनेनंतर; विजय वडेट्टीवारांचे भाकीत

Vijay Wadettiwar News : अनेकांना महायुतीत जाऊन चुकलो, असा पश्चाताप होत आहे. अनके जण उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : आमदार पात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होईल, असे भाकीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वर्तविले. (political earthquake in Maharashtra Earler : Vijay Vadettiwar)

शंभूराज देसाई नेहमी भूकंप होईल असे म्हणतात. मात्र, हा भूकंप कधीच होत नाही. लवकरच हा भूकंप होईल जर विधानसभा अध्यक्षांनी योग्य निर्णय घेतला, तर महाराष्ट्रातील या राजकीय भूकंपाचे धक्के कसे असतील, हे शंभूराज देसाई यांना कळणारही नाही. सध्या महाराष्ट्रात महायुतीची वाट लागली आहे. अनेकांना महायुतीत जाऊन चुकलो, असा पश्चाताप होत आहे. अनेक जण उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला.

Vijay Wadettiwar
Karmala Bazar Samiti : जयवंतराव जगताप पुन्हा होणार सभापती; विजयादशमीच्या मुहूर्तावर गेलेली सत्ता त्याच दिवशी मिळविणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळ जाऊन काहीजण रडत आहेत. थोडेसे पैसे आम्हाला कमवू द्या, त्यानंतर आम्ही पुन्हा तुमच्याकडे येतो, असे हे नेते पवारांना सांगत असल्याचा दावाही विरोधी पक्षनेत्यांनी केला.

ओबीसीही शक्ती दाखवतील

आरक्षणातील ओबीसी समाजाचा वाटा कमी करू नये. मराठा समाज जर शक्तिप्रदर्शन करत असेल तर ओबीसी संघटनांची कृती समिती गठीत करून सभेची तयारी केली जात आहे. ओबीसी हा साडेतीनशे जातींचा समाज आहे. आम्हाला सर्वांना एकत्र करायला जास्त वेळ लागणार नाही. मराठा समाजाच्या आंदोलनाला अदृश्य शक्ती पाठिंबा देत आहेत. क्रिमिलियरमध्ये वाढ करण्याची मागणी बरेच दिवसांपासून प्रलंबित आहे. ही वाढ करणे नितांत गरजेचे असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

संविधानदिनी सभा

पुढील महिन्यात संविधानदिनी सभा घेण्याचा प्रयत्न आहे. पक्षापलीकडची ही बैठक आहे. आपण संपूर्ण शक्तिनिशी ओबीसी समाजाच्या पाठीशी आहोत, असे ते म्हणाले. आम्ही महाराष्ट्रातील सर्व समाजाला घेऊन चालत आहोत. आम्ही धमकीची भाषा करत नाही, परंतु कोणी आमच्या बाबतीत धमकीची भाषा करत असेल तर ती कदापि सहन केली जाणार नाही, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला.

Vijay Wadettiwar
Police Land Case : अजितदादांच्या मदतीला धावले बंड; ‘तो प्रस्ताव शंभर टक्के बरोबर, पण पवारांचा संबंध नव्हता’

मराठा समाज आणि ओबीसी आरक्षण या मुद्द्यावर सरकारने कोणाला काय वचन दिले आहे, ही बाब तपासून पाहिलीच पाहिजे, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली. कोणत्याही समाजावर अन्याय होऊ न देता महाराष्ट्रातील आरक्षणाचा तिढा सुटला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करीत वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला सुवर्ण मध्य काढण्याची मागणी केली.

Vijay Wadettiwar
Cabinet Expansion News : दिवाळीत मोठा धमाका; शरद पवार गटातील बडा नेता महायुती सरकारसोबत येणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com