Cabinet Expansion News : दिवाळीत मोठा धमाका; शरद पवार गटातील बडा नेता महायुती सरकारसोबत येणार!

Shinde Fadnavis Ajit Pawar Government Cabinet Expansion : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असताना शिंदे गटातील एका मंत्र्याने मोठा दावा केला आहे.
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde News
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde NewsSarkarnama

Maharashtra Politics News : राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अशातच आता शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठे वक्तव्य केले आहे. दिवाळीत मोठा धमाका होणार आहे, असे शंभूराज देसाई म्हणाले.

शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आता शिंदे गटातील मंत्री शंभूराज देसाई यांनीही याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. दिवाळीत मोठा धमाका होणार आणि शरद पवार गटाचा मोठा नेता शिंदे, फडणवीस आणि अजित पवार सरकारमध्ये सहभागी होणार, असे शंभूराज देसाई म्हणाले. यामुळे हा बडा नेता कोण? याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde News
Dhananjay Munde News : धनंजय मुंडे शेतकऱ्यांना म्हणाले, "तर मी यंदा दिवाळी करणार नाही..."

काय म्हणाले शंभूराज देसाई?

'राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. पितृपक्ष होता त्यामुळे काहींना अडचणी होत्या. आता पितृपक्ष संपला आहे आणि काल घटस्थापना झाली आहे. त्यामुळे आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल', असे शंभूराज देसाई म्हणाले.

'राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील काही नेते महायुतीच्या सरकारमध्ये यायला इच्छुक आहेत. असे अनेक जण आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या चर्चा सुरू आहेत. त्यांचा निर्णय होत असेल, त्यामुळे थोडा विलंब होतोय. पण राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील बडा नेता किंवा आमदारांचा मोठा गट महायुतीला समर्थन देण्यासाठी सरकारमध्ये सहभागी होत असला, तर आम्ही त्यांचं स्वगत करू', असे देसाई यांनी सांगितलं.

दिवाळीत मोठा धमाका होणार?

'दिवाळी आता जवळ आली आहे. त्यामुळे धमाका आता सुरू झाला आहे. नवरात्र आणि दसरा आपण उत्साहात साजरा करतो. अजित पवार यांच्या नेतृत्वात ९ आमदारांनी मंत्रिपदाची अचानक शपथ घेतली. हे आपण पाहिलं. तसंच कदाचित होण्याची शक्यताही नाकारता येत नाही', असा दावा शंभूराज देसाई यांनी केला आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde News
Mangalwedha News : मंगळवेढ्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू; पहिल्याच दिवशी वेबसाइटचा 'खोडा'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com