Nitin Gadkari : असे कोण म्हणाले...'विदर्भात गडकरी वगळता भाजपला भोपळा'

Chandrapur Congress : चंद्रपूरामध्ये काँग्रेस तिकिट कोणाला मिळणार ?
Nitin  Gadkari
Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : एका गीतामध्ये कवीने विरोधक आणि शत्रुंच्या जवळच्या व्यक्तीचा उल्लेख केला आहे. हे अधोरेखित करताना कवीने ....'शत्रु को भी जीतता था आपका चारित्र्य उज्वल....निन्दकों पर मात करता आपका व्यवहार निर्मल....' अशी व्यापक भूमिका विषद केली आहे. याचा दोन ओळींचा प्रत्यत अगदी नितीन गडकरी यांच्यासाठी पण,वेगळ्या शब्दात डाॅ.विश्वंभर चौधरी यांनी अधोरेखित केला आहे. त्यांनी फक्त विदर्भात नितीन गडकरी वगळता भाजपा भोपळा असे शब्द उचारले आहे. डाॅ. विश्वंभर चौधरी वारंवार भाजप विरोधी भुमिका घेत असताना त्यांनी गडकरींवर दाखविलेला विश्वास हा निश्चित नितीन गडकरींचे कौतुक करणारे, त्यांच्यावर जनतेचा असलेला विश्वास अधोरेखित करणारे असेच आहे.

शेतीविरोधी धोरणावरून भाजप सध्या बँकफूटवर आहे. येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत याचा भाजपला मोठा फटका बसणार आहे. केंद्रीय मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना वगळता विदर्भात भाजपला भोपळाच मिळेल. महाविकास आघाडी येत्या निवडणुकीत दमदार कामगिरी करणार असून त्यांचे 28 पेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील, असा विश्वास डाॅ.विश्वंबर चौधरी यांनी व्यक्त केला. चंद्रपुरात आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या पुढाकारातून बहुजन विचार मंच व्दारा आयोजित "लढा विचारांचा,सन्मान संविधानाचा" कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी चौधरी यांनी हे विधान केल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nitin  Gadkari
Devendra Fadnavis News : 'महाराष्ट्राच्या संस्कृतीची एवढीच तुम्हाला चिंता असेल, तर...' ; फडणवीसांचा विरोधकांना टोला!

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहेत. कुठल्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहिर होऊ शकतो. यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यात ‘निर्भय बनो’या संकल्पना राबवित डाॅ. विश्वंबर चौधरी दौरा करित आहेत. काल (ता.24) ते चंद्रपुरात होते. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केल. भाजपच्या शेतीविरोधी धोरणाबाबत चौफेर संताप दिसत आहे. भाजपच्या काॅल सेंटरवरून योजनांची महती सांगणाऱ्यांना शेतकरी आता चांगलेच सुनावू लागले आहेत. "भारत सरकार" कि "मोदी सरकार" यावरून मतदारांमध्ये कमालीची चिड निर्माण झाली आहे. नागपूरात अधिवेशन सुरू असतांना एका आठवडयात यवतमाळ जिल्ह्यात पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. या सर्व परिस्थीतीचा थेट फटका भाजपला विदर्भात बसणार आहे. विदर्भातून नितीन गडकरी हे निवडणूक जिंकतील. उर्वरित ठिकाणी त्यांना मात्र भोपळा मिळेल. काँग्रेससाठी मात्र विदर्भात यावेळी आशादायी चि़त्र असेल असा विश्वास चौधरी यांनी व्यक्त केला.

चंद्रपूरातून कुणाला मिळणार संधी

लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूरात रस्सीखेच बघायला मिळत आहे. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी उमेदवारीचा दावा केला आहे. पतीच्या दुखःद निधनानंतर त्यांनी स्वतःला सावरले. त्यानंतर पुर्ण ताकद लावत त्यांनी पक्षीय कार्य सुरु केले आहे. गेल्या काही महिन्यात त्यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात अनेक उपक्रम राबविले. ओबीसी आंदोलनात त्यांनी हिरहिरीने सहभाग घेतला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समोर घेत महावितरणच्या कार्यालयाला कुलूपही ठोकले. पुर्ण ताकदीने लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. दरम्यानच्या काळात पक्षाने संधी दिल्यास आपण लोकसभा निवडणूक लढवू, असे विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे आता चंद्रपूरात काँग्रेस कुणावर जास्त विश्वास दाखविणार याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागले आहे. मागील निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी महाराष्ट्रात एकट्याने विजय संपादीत केला होता हे मात्र विशेष.

Edited by - Sachin Deshpande

Nitin  Gadkari
Vanchit Bahujan Aghadi : ‘त्या’बाबत मात्र मोदी खरे बोलले, आंबेडकर असे का म्हणाले?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com