वीज पुरवठा खंडित करणार ; थकबाकीदारांना ऊर्जामंत्री राऊतांचा इशारा

वीज ग्राहकांनी थकबाकीची रक्कम भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन राऊतांनी यावेळी केले.
Nitin Raut News Updates: Nitin Raut on electricity bill
Nitin Raut News Updates: Nitin Raut on electricity billsarkarnama
Published on
Updated on

अकोला : राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांच्या हस्ते महावितरणकडून उच्च दाब वितरण प्रणाली योजनेत उभारण्यात आलेल्या अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू, बार्शी टाकळी तालुक्यातील कोथळी आणि घोटा येथील वीज उपकेंद्राचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राऊतांनी थकबाकीदारांचा वीज पुरवठा(power supply) खंडित करणार असल्याचे सांगितले.

नितिन राऊत म्हणाले, ''कोरोना काळात सर्वत्र ताळेबंदी असताना महावितरणकडून राज्यातील जनतेला अखंडित वीज पुरवठा करण्यात आला. कोरोनामुळे काही जणांच्या रोजगारावर संकट आले याची आम्हाला कल्पना आहे. पण जर वीज वापरली असेल तर येणाऱ्या देयकाचे पैसे भरावेच लागेल,'' वीज ग्राहकांनी थकबाकीची रक्कम भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन राऊतांनी यावेळी केले.

''ग्राहक वीज देयकाची रक्कम भरणार नाहीत अशा वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल आणि हे करताना कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही ,असा स्पष्ट इशारा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला.

''राज्यभरात शेतकऱ्यांचे वीज बिल खंडित करण्यावरून तीव्र आंदोलने सुरू असताना ऊर्जामंत्री यांचे वक्तव्य हे आंदोलन करणाऱ्यांना स्पष्ट संदेश असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आंदोलक व राज्य सरकार यांच्यातील संघर्ष विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वाढण्याची शक्यता आहे.

अवघ्या ७० मिनिटात दक्षिण मुंबईतील वीज पूर्ववत

दक्षिण मुंबई वीजपुरवठा खंडित झाल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याचे नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिले आहेत. वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर स्वतः ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी ‘ॲक्शन मोड’मध्ये येत सर्व संबंधित अधिकारी आणि टाटा कंपनीचे उच्चपदस्थ अधिकारी यांच्याशी सतत संपर्कात होते. “या घटनेची माहिती मिळताच मी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे तसेच महापारेषण व राज्य भारप्रेषण केंद्रातील प्रमुखांशी सतत संपर्कात होतो. वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत व्हावा यासाठी मी त्यांना सूचना दिल्या आणि या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

Nitin Raut News Updates: Nitin Raut on electricity bill
राऊतांची अवस्था भरकटलेल्या जहाजासारखी ; मोहोळांचे प्रत्युत्तर, 'हा' धंदा कुणाच्या आशीर्वादाने

टाटा कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी ही प्रत्यक्ष बोलून वीजपुरवठा तात्काळ सुरू होण्याबाबत चर्चा केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी दुरुस्तीच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष कामावर देखरेख ठेवण्याच्या सूचना दिल्या. विविध कारणांमुळे झालेला हा बिघाड दुरुस्त करून अवघ्या ७० मिनिटात दक्षिण मुंबईतील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला,”असे डॉ. राऊत यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com