Loksabha Election 2024 : अजून तरी 'मविआ'मध्येच...; प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने खळबळ

Prakash Ambedkar on MVA : भंडाऱ्यातील जाहीर सभेत प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेवर जोरदार टीका केली. तिन्ही पक्षांत भांडणे सुरू आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केली
Nana Patole, Sharad Pawar, Uddhav Thackeray, Prakash Ambedkar
Nana Patole, Sharad Pawar, Uddhav Thackeray, Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Bhandara Political News :

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर त्यांच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल प्रसिद्ध आहेत. सध्या ते महाविकास आघाडीसोबत आहेत आणि लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरू आहे. असं असताना त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. भंडाऱ्यातील अधिकार महासभेत महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या चर्चेबद्दल जाहीर वक्तव्य करून महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ केल्याची चर्चा सुरू झाली आहे. आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीत जागावाटपाच्या चर्चेवरून भांडणे आहेत आणि त्यांच्यातील भांडणं संपल्यानंतर आमच्याशी चर्चा होईल.

Nana Patole, Sharad Pawar, Uddhav Thackeray, Prakash Ambedkar
Bhandara Vanchit News : माजी आमदार वाघाये आंबेडकरांपासूनही राहिले ‘वंचित’

महाविकास आघाडीमध्ये (MVA) लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) जागावाटपावरून वाद सुरू आहेत. काँग्रेस आणि ठाकरे गटात 10 जागांवरून भांडणे सुरू आहेत. ठाकरे गट, काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात 5 जागांवर भांडणे सुरू आहेत. 48 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीमध्ये भांडणे आहेत. त्यामुळे तुमची भांडणे संपल्यावर आमच्याशी चर्चा करा, अशी आमची भूमिका आहे, असे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले.

जे अडीच वर्षे चर्चा करू शकले नाहीत आणि 48 जागांचं वाटप करू शकले नाहीत त्यांना आम्ही एकच सांगतो 12 ते 16 मार्चदरम्यान आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे भांडण मिटलं नाही तर काय होईल, हे लक्षात घ्या. आता अपेक्षा करतो यांच्यातील भांडण मिटेल आणि आमच्याशी चर्चा होईल.

अजून बाहेर पडलो नाही...

या वेळी प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं. आम्ही अजून महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला नाही. जागावाटपाचं (Loksabha seat Sharing) गुऱ्हाळ लांबल्यामुळे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीवर नाराज झाल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बैठक, कॉफी अन् पुढची बैठक

महाविकास आघाडीचे नेते म्हणतात आम्ही बैठकीला वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aaghadi) बोलावले आहे. आम्हीही चर्चेला जातो, कॉफी पितो आणि विचारतो तुमचं भांडण संपलं का? ते म्हणतात पुढच्या मीटिंगमध्ये, मग आम्हीही पुढच्या बैठकीला जातो, या शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या गोंधळाचं वर्णन केले.

(Edited by Avinash Chandane)

R

Nana Patole, Sharad Pawar, Uddhav Thackeray, Prakash Ambedkar
Lok Sabha Election 2024 : ...तर शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये सुटेल जागावाटपाचा तिढा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com