Lok Sabha Election 2024 : ...तर शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये सुटेल जागावाटपाचा तिढा!

Sharad Pawar And Prakash Ambedkar Meeting : शरद पवार अन् प्रकाश आंबेडकरांच्या बैठकीकडे महाविकास आघाडीसह राज्याचं लक्ष लागलं आहे.
prakash ambedkar sharad pawar
prakash ambedkar sharad pawarsarkarnama
Published on
Updated on

एकेकाळी राजकारणातील एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ज्यांची चर्चा व्हायची ते म्हणजे प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) आणि शरद पवार... मात्र वंचितला ( Vanchit Bahujan Aghadi ) महाविकास आघाडीत ( Mahavikas Aghadi ) घेण्यासाठी सर्वात आग्रही भूमिका ही सुरुवातीपासूनच शरद पवार ( Sharad Pawar ) यांची राहिली आहे. आता 6 मार्चला शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांची बैठक होणार आहे. त्यामुळे पवार आणि आंबेडकरांच्या बैठकीत जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

prakash ambedkar sharad pawar
PM Modi in Bengal : ममता बॅनर्जी यांच्या ' माँ, माटी, माणूस'ला धक्का !

भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधक 'इंडिया' आघाडीच्या नेतृत्वाखाली एकत्र आले होते. पण, लोकसभा निवडणुकीपूर्वीच 'इंडिया' आघाडीत फूट पडली, तर महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि वंचित बहुजन आघाडीतील जागावाटपाबाबत चर्चा अद्यापही प्राथमिक स्तरावर अडकली आहे. दुसरीकडे भाजपनं 195 जागांवर उमेदवारांची यादी जाहीर करत प्रचाराला सुरुवात केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशातच वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी ( Prakash Ambedkar ) महाविकास आघाडीच्या बैठकांना जाऊ नये, असे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे वंचित आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम आहे. पण, 6 मार्चला शरद पवारांनी ( Sharad Pawar ) चर्चेला बोलावल्याची माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. पण, "जागावाटबाबात निर्णय न झाल्यानं बैठकीनंतर, त्याबद्दल बोलता येईल. आताच बोलणं उचित ठरणार नाही," असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली असून, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे. तसेच, शरद पवार जागावाटपाचा तिढा सोडवू शकतात.

prakash ambedkar sharad pawar
Lok Sabha Election 2024 News : अवघ्या काही तासांत भाजपच्या दोन खासदारांचा राजकारणातून संन्यास ! नेमकं काय आहे कारण?

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरण पूर्णतः बदलले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत याचे परिणाम दिसण्याची शक्यता आहे. राज्यात भाजप तीन पक्ष एकत्र आले असले, तरी शरद पवारांकडून महाविकास आघाडीत आणखी मित्रपक्ष जोडण्यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांमुळे शरद पवार ( Sharad Pawar ) हे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रकाश आंबेडकरांच्या कायम संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित फॅक्टरमुळे मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपला झाला होता. त्यामुळे शरद पवारांचे वंचितला बरोबर घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कारण वंचितच्या समावेशामुळे लोकसभा निवडणुकीत 'सोशल इंजिनिअरिंग' साधणे महाविकास आघाडीला शक्य होणार आहे.

prakash ambedkar sharad pawar
BJP Candidates List : भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रासह, ज्येष्ठांना डच्चू; तर ओबीसींवर फोकस अन्...

प्रकाश आंबेडकरांचा 'सोशल इंजिनिअरिंग'चा प्रयोग संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. हाच प्रयोग आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला तारण्याची शक्यता आहे. वंचितला चार ते पाच जागा देणं शक्य असल्याचं शरद पवारांनी नुकतेच पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना सांगितलं होतं. मात्र, एवढ्या जागांवर प्रकाश आंबेडकर तयार होतात का? हे पाहावं लागणार आहे.

prakash ambedkar sharad pawar
Namo Maharojgar Melava : अहो आश्चर्य ! 'बेरोजगार' म्हणून बारामतीत 'महारोजगार' मेळावा !

महाविकास आघाडीच्या चर्चेच्या फेऱ्या सुरूच आहेत. जागावाटपाचा वाद मिटवण्यासाठी शरद पवार पुढाकार घेण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत आणि वंचितमधील महत्त्वाचा दुवा शरद पवार ठरणार आहेत. महाविकास आघाडी आणि वंचित एकत्र आल्यास राज्यातील राजकीय समीकरण बदलणार हे मात्र नक्की. त्याचा फायदा सर्वाधिक महाविकास आघाडीला होणार आहे. हे सर्व शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतरच शक्य असल्याचं बोललं जात आहे.

R

prakash ambedkar sharad pawar
Lok Sabha Election 2024 : हे तर हातावर 'मेरा बाप चोर है....' लिहिण्यासारखेच !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com