Amravati : प्रकाश आंबेडकर कोणाच्या निमंत्रणाची वाट बघत आहेत का?

Prithviraj Chavan : मल्लिकार्जुन खर्गे यांना थेट भेटायला अडचण नाही
Mallikarjun Kharge & Prakash Ambedkar
Mallikarjun Kharge & Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

India Alliance : राहुल गांधी यांची भारत जोड न्याय यात्रा सुरू झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांना त्यामध्ये निमंत्रण देण्यात आले होते. मात्र ‘इंडिया’ आघाडीमध्ये आपल्याला काँग्रेसकडून बोलावणे आलेच नाही. ‘इंडिया’ आघाडीमध्ये यायचे आहे, अशी इच्छा अॅड. आंबेडकर यांनी व्यक्त करीत आहेत. त्यावर काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अमरावती येथे भाष्य केले.

चव्हाण म्हणाले की, प्रकाश आंबेडकर कोणाच्या निमंत्रणाची वाट बघत आहेत? मल्लिकार्जुन खर्गे यांना ते चांगले ओळखतात. ‘इंडिया’ आघाडी आणि महाविकास आघाडीतील प्रत्येक नेत्याला ते व्यक्तीश: ओळखतात. त्यामुळे त्यांनी स्वत: खर्गे यांना भेटायला काय हरकत आहे. काँग्रेसच्या पश्चिम विभागीय मेळाव्याच्या निमित्ताने अमरावती येथे आले असता चव्हाण यांनी यासंदर्भात भाष्य केले.

Mallikarjun Kharge & Prakash Ambedkar
Amravati : ‘इंडिया’ मजबूत होत असल्यानेच भाजपकडून संभ्रम निर्माण केला जातोय

‘इंडिया’ आघाडी ही 28 घटक पक्षांनी एकत्र येत तयार केली आहे. प्रकाश आंबेडकर हे ‘इंडिया’ आघाडीच्या सर्व नेत्यांना व्यक्तीगतपणे ओळखतात. त्यांचे सर्व नेत्यांशी चांगले संबंधही आहेत. अशात ‘इंडिया’ आघाडीमध्ये यायचे असेल तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आंबेकडकरांनी प्रत्यक्ष भेटयला हवे. खर्गे यांची भेट घेत थेट बोलून आंबेडकर आघाडीत येऊ शकतात. मात्र त्यांना नरेंद्र मोदिंना हरवायचे की नाही, हा खरा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाच्या एका प्रवक्त्यांनी काँग्रेसला पत्र पाठविलेले आहे. मात्र आंबेडकर त्यांनी स्वत: अद्यापही कोणतेही पत्र ‘इंडिया’ आघाडीला पाठविलेले नाही. त्यांना जर इंडिया आघाडीमध्ये यायचे असेल तर त्यांनी थेट मल्लिकार्जुन खर्गे यांना प्रत्यक्ष भेटायला हवे. त्यात कोणतीही अडचण नाही, असे चव्हाण यांनी नमूद केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रकाश आंबेडकर हे देशातील मोठे दलित नेते आहे. आंबेडकर नाव असलेले ते एकमेव नेते आहेत. ते संसदेत आले पाहिजे ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. मात्र जगावाटपादरम्यान त्यांनी अवास्तव मागणी करणे योग्य नाही. आंबेडकर गेल्यावेळी आघाडीमध्ये आले नाहीत.

त्यांच्या अवास्तव मागणीमुळे 2019 मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीतील नऊ उमेदवार पराभूत झालेत. त्यावेळी आंबेडकर यांचा पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढला. त्यांचा अप्रत्यक्ष फायदा हा भाजपाला झाला आहे, असेही चव्हाण यांनी लक्षात आणून दिले,

प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेसने सोबत घेतले पाहिजे ही सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी एवढे आढेवेढे घेणे ही देखील योग्य बाब नाही. त्यांना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पराभूत करायचे आहे.

काँग्रेसला देखील देशातून जातीयवादी शक्ती हद्दपार करायच्या आहेत. आंबेडकर आपल्या ध्येयाबाबत ठाम असतील तर त्यांना थोड्याफार प्रमाणात तडजोड करावी लागेल, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले.

(Edited By : Prasanna Jakate)

Mallikarjun Kharge & Prakash Ambedkar
Amravati : शेतकऱ्यांसाठी सत्ताधारी प्रहारने केली महसूल विभागाची दशक्रिया

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com