Prakash Ambedkar's Clip : प्रकाश आंबेडकरांची ‘ती’ क्लिप झाली व्हायरल, अन् कॉंग्रेसची डोकेदुखी वाढली !

Congress : आंबेडकर यांनी जाहीर केल्यामुळे आता काँग्रेसपुढे मोठे आव्हान उभे झाले आहे.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

He announced that he will contest the election himself : वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला लोकसभा मतदारसंघात ते स्वतः निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. त्या संदर्भातील त्यांची एक क्लिप सध्या सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहे. आंबेडकर यांनी जाहीर केल्यामुळे आता काँग्रेसपुढे मोठे आव्हान उभे झाले आहे. (Congress has faced a big challenge)

काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबतची चर्चा सर्व माध्यमांवर सुरू आहे. त्यात दिल्लीत बैठकाही झाल्याचे सांगण्यात आले. अशा परिस्थितीत आंबेडकर यांनी स्वतःची अकोला लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर केल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

‘प्रदेश’च्या चुकांमुळे कॉंग्रेसची वाताहत..

आतापर्यंत अकोला जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही प्रदेशवरून झालेल्या चुकांमुळे काँग्रेसची वाताहत झाल्याची खंत काँग्रेसचे पक्ष निरीक्षक नाना गावंडे यांनी अकोला येथे व्यक्त केली. पण नाना पटोले यांनी प्रदेशची सूत्रे हाती घेतल्यापासून काँग्रेससाठी राज्यातच नव्हे तर अकोला जिल्ह्यातही चांगले वातावरण निर्माण झाल्याचे पक्ष निरीक्षक नाना गावंडे म्हणाले.

नाना गावंडे यांनी अकोला लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. विद्यमान प्रदेशाध्यक्षांनी निर्माण केलेल्या वातावरणाचा फायदा आगामी निवडणुकींमध्ये करून घेण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. नाना पटोले यांनी प्रदेश काँग्रेसची सूत्रे हाती घेण्यापूर्वी राज्यातील पक्षाच्या स्थितीबाबत भाष्य केले.

Prakash Ambedkar
Prakash Ambedkar News : शेतकऱ्यांच्या ‘या’ प्रश्‍नासाठी सरसावले प्रकाश आंबेडकर, दिला आंदोलनाचा इशारा !

काँग्रेसची वाताहत होण्यामागे सभागृहात बसलेल्या नेत्यांनाच जबाबदार धरता येणार नाही, तर कुठे तरी आतापर्यंत प्रदेश स्तरावरूनही चुका होत गेल्‍या. गटातटांच्या राजकारणावर त्यांना नियंत्रण ठेवता आले नाही. नाना पटोले यांच्या नेतृत्वात पक्षाला चांगले दिवस आले आहेत. राहुल गांधी यांच्या पदयात्रेनंतर अकोल्यासह राज्यात काँग्रेसला नवीन ऊर्जा मिळाल्याचे गावंडे म्हणाले.

अकोला जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर आणि महानगराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे यांनी अकोला लोकसभा मतदारसंघ काँग्रेसनेच लढविण्याबाबतचा ठराव मांडला. युतीबाबतही त्यांनी नेत्यांची मते जाणून घेतली. ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, प्रदेश सचिव प्रकाश तायडे, डॉ. अभय पाटील, प्रशांत गावंडे, साजीद खान आदींसह सर्व नेत्यांनी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी (Election) अकोल्यात उमेदवार देण्याबाबत मदत व्यक्त केले.

Prakash Ambedkar
Prakash Ambedkar यांची मोठी घोषणा, 'या' मतदारसंघातून लढवणार निडणूक | VBA | Loksabha Election| Akola

काही नेत्यांनी युती किंवा स्वतंत्रपणे लढण्याबाबत प्रदेश स्तरावरून निर्णय घ्यावा, त्याचा आम्ही सन्मानच करून, असेही सांगितले. या बैठकीला अकोला (Akola) जिल्ह्यातील काँग्रेसचे (Congress) सर्व प्रमुख नेते, सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व युवा नेतेही उपस्थित होते.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com