Nana Patole News : नाना पटोले यांना थेट दिल्लीतून धक्का; नेमकं काय झालं ?

Chandrapur Congress : पटोले यांना काँग्रेसअंतर्गत विरोधाच्या चर्चांना उधाण
Nana Patole, Prakash Deotale
Nana Patole, Prakash DeotaleSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Congress Politics : चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजय वडेट्टीवार आणि भाजपच्या पॅनलने हातमिळवणी केली. त्यामुळे खासदार बाळू धानोरकर यांच्या पॅनेलचा पराभव झाला होता. यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे चंद्रपूरचे प्रकाश देवतळे यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवले होते. पटोले यांच्या या कारवाईला आता काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी स्थगिती दिली आहे. (Latest Marathi News)

प्रकाश देवतळे यांच्यावर पटोले यांनी जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्याची मोठी कारवाई केली होती. या कारवाईला थेट दिल्लीतून स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. तर पक्षांतर्गत पटोले यांचे विरोधक असलेले विजय वडेट्टीवार यांची सरशी होत आहे. यातून पटोले यांना दिल्लीतून दणका दिल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसअंतर्गत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराजी असल्याचे वारंवार समोरे आले आहे.

Nana Patole, Prakash Deotale
Nagpur Congress News : राष्ट्रवादी काॅंग्रेस सतत तीन वेळा अपयशी, हिंगण्यावर कॉंग्रेसने ठोकला दावा !

देवतळेंची भावना

पटोले यांच्या कारवाईच्या निर्णयला स्थगिती दिल्यानंतर जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे. देवतळे म्हणाले, "माझ्यावर थोडा अन्याय झाला होता. बाजू मांडण्यासाठी मी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रीय अध्यक्षांशी पत्र व्यवहार केला होता. त्यानुसार माझी बाजू मांडली आहे. आता पक्ष जे आदेश देणार ते काम मी गेल्या दहा वर्षांपासून करत आहे."

Nana Patole, Prakash Deotale
Radhakrishna Vikhe Patil News : पंढरपूरच्या विकास आराखड्याबाबत राधाकृष्ण विखेंचं मोठं विधान; म्हणाले...

नेमकं काय झालं होतं ?

चंद्रपूर बाजार समितीच्या निवडणुकीत विजय वडेट्टीवार यांनी भाजपा जिल्हाध्यक्षांशी हातमिळवणी केली होती. यात काँग्रेसच्या पॅनलचा पराभव झाला होता. या निकालानंतर भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी एकत्र आनंदोत्सव साजरा केला. ते गुलाल उधळत ढोल-ताशाच्या तालावर थिरकले होते. यावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दवतळे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली होती. तसेच राजुराचे आमदार सुभाष धोटे यांची चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली होती. आता या निर्णयाला दिल्लीतून स्थगिती देण्यात आली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com