Radhakrishna Vikhe Patil News : पंढरपूरच्या विकास आराखड्याबाबत राधाकृष्ण विखेंचं मोठं विधान; म्हणाले...

Pandharpur Development Plan : विकासाबाबत पंढरपूरकरांना सर्व कल्पना दिलेली आहे
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Radhakrishna Vikhe Patil On Pandharpur Development : पंढरपूर विकास आराखड्याची एकूणच कामांची जबाबदारी शासनाने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सोपवलेली आहे. यावर अहमदनगर येथे बोलताना विखे पाटलांनी मोठे विधान केले आहे. यामुळे पंढरपूरमधील स्थानिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

राधाकृष्ण विखे पाटील नगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पंढरपूरचा विकास आराखडा हा लोकाभिमुख असणार आहे. त्याबाबत वारंवार बैठका झाल्या आहेत. यातून या विकास आराखड्याबाबत स्थानिकांना पूर्ण कल्पना दिलेली आहे. मात्र आषाढी यात्रेनिमित्त अजून कुणाची काही निवेदने असतील तर मुख्यमंत्री सर्वांचा विचार करूनच पंढरपूरचा विकास करणार असल्याचे विखे पाटलांनी यावेळी स्पष्ट केले.

Radhakrishna Vikhe Patil
Shambhuraj Desai News : मंत्री शंभूराज देसाईच उतरले रस्त्यावर; पुण्यात उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

विखे पाटील म्हणाले, " सरकारचे ठरले आहे की कोणताही विकास आराखडा स्थानिक लोकांना विश्वासात घेऊनच अवलंबिला जाईल. पंढरपूर येथील स्थानिक लोकांना विश्वासात घेऊनच पंढरपूरचा विकास केला जाईल. आता आषाढी यात्रेनिमित्त आणखी कुणाची काही निवेदने असतील तर मुख्यमंत्री त्या सर्वांचा विचार करतील. त्यानंतरच पंढरपूरचा विकास करणार आहे. दरम्यान, याबाबत स्थानिकांना पूर्ण कल्पना दिलेली आहे."

दरम्यान, नमामी चंद्रभागा प्रकल्पानिमित्त कामे होत नसल्याचा आरोप होत आहे. हा आरोप सोलापूर जिल्हा भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांनी केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर विकास आराखडा सादर करूनच आषाढी एकादशीला महापूजेला यावे, अन्यथा येऊ नये असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.

Radhakrishna Vikhe Patil
Aaditya Thackeray News: आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण ईडीच्या रडारवर; 15 ठिकाणी छापेमारी...

जोगदंड यांच्या भूमिकेबाबत छेडले असता राधाकृष्ण विखे म्हणाले, "पंढरपूरच्या विकासाला कोणाचा विरोध नाही. आम्ही जो पंढरपूर विकास आराखडा तयार केला आहे त्याची कल्पना स्थानिक लोकांना दिली आहे. पंढरपूरच्या स्थानिक नागरिकांच्या इच्छेपलीकडे, इच्छेविरुद्ध राज्य सरकार कोणतीही भूमिका घेणार नाही. त्यामुळे आषाढीनिमित्त काही लोकांना मुख्यमंत्री यांना निवेदन द्यायचे असेल तर त्याचे स्वागत असेल."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com