Chandrapur Constituency: मोदींना वैतागले मुनगंटीवारांना फटकारले; काय घडलं चंद्रपुरात?

Chandrapur Lok Sabha Constituency Pratibha Dhanorkar Vs Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचे भरटकलेले प्रचारतंत्र, मोदीं विरोधातील रोष, बाळू धानोरकरांविषयची सहानभुतीची लाट आणि जनतेने हातात घेतलेली निवडणूक या सर्व घटकामुळे भाजपला पराभवाचा सामना करावा लागला.
Narendra Modi, Sudhir Mungantiwar
Narendra Modi, Sudhir MungantiwarSarkarnama

Pratibha Dhanorkar Chandrapur Lok Sabha winner: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी विजय खेचून आणला. त्यांनी या मतदारसंघात भाजपचे उमदेवार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. मुनगंटीवारांचे भरटकलेले प्रचारतंत्र, पंतप्रधान मोदीं विरोधातील रोष, बाळू धानोरकरांविषयची सहानभुतीची लाट आणि जनतेने हातात घेतलेली निवडणूक या सर्व घटकामुळे भाजपला पराभवाचा सामना करावा लागला.

सन 2019 च्या मोदी लाट काँग्रेसचे दिवगंत खासदार बाळू धानोरकर यांना चंद्रपूरात थोपविली होती. मोदी लाटेतील लोकसभेच्या (Lok Sabha) निवडणुकीत ते राज्यातील एकमेव काँग्रेसचे खासदार निवडणून आले होचे. त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांना पक्षांतर्गत विरोधकांशी उमेदवारीसाठी दोन हात करावे लागले. हाच संघर्ष त्यांच्या पत्थ्यावर पडला आणि एका विशिष्ट जातसमुह त्यांच्या पाठीमागे एकवटला. या मतदारसंघात भाजप थेट लढतीत अनेक वेळा पराभूत झाला आहे. या लोकसभेतही त्याची पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळालं.

राज्यातील मोदींची पहिली सभा चंद्रपुरात (Chandrapur) झाली. याच सभेत मुनगंटीवारांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोदींच्या सभेचा अपेक्षित परिणाम झाला नाही. दुसरीकडे महागाई, बेरोजगारी, संविधान बदलविण्याची शक्यता आणि देशातील कथित हुकूमशाही याभोवतीच धानोरकरांचा प्रचार केंद्रित राहीला. त्यांनी संयम ढळू दिला नाही. सुरवातीच्या टप्प्यातच मतदारांमध्ये मुनगंटीवारांविषयी काही प्रमाणात नकारात्मकता निर्माण झाली. भाजपकडून ओबीसी मतांच्या धुव्रीकरणाचा प्रयत्न झाला. तो यशस्वी होऊ शकला नाही. धानोरकांच्या मागे जात हा सपोर्टिंग फॅक्टर होता.

मुनगंटीवार भाजपमध्ये एकटे पडले. महायुती नावालाच होती. मुनगंटीवार फक्त आणि फक्त भाजपचे उमेदवार होते. मुनगंटीवारांच्या प्रचारात नेहमी दिसणारे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची फळी बाजूला पडली. अनुभवी लोकांच्या हातात संपूर्ण प्रचार यंत्रणा गेली. त्याचा फटका त्यांना बसला. उद्धव ठाकरे समर्थक मतदार वरोरा आणि वणी मतदारसंघात मोठ्या संख्येत असून या निवडणुकीत ती मते काँग्रेसकडे वळली.

Narendra Modi, Sudhir Mungantiwar
Shyamkumar Barve Lok Sabha Winner: रामटेकच्या गडावर काँग्रेसचा झेंडा, पारवेंच्या विरोधातील लढाई बर्वेंनी जिंकली

काँग्रेसच्या संविधान धोक्यात असल्याच्या प्रचारतंत्राचा मोठा परिणाम आंबेडकरी समुदायातील मतदारांमध्ये दिसून आला. त्यासोबतच मुस्लिम मतदार काँग्रेसच्या बाजूने एकटवले. लोकसभा क्षेत्रात सर्वदूर हंसराज अहीर समर्थक आहेत. मात्र ते अखेरपर्यंत घराबाहेर पडलेले दिसले नाहीत. उमेदवारी नको म्हणण्यापासून सुरू झालेला प्रवास भाजपचे राज्यातील काही नेते मुनगंटीवारांचा ‘गेम’ करत आहे, इथपर्यंत येवून ठेपला. त्याचाही परिणाम या निवडणुकीवर झाला. याशिवाय निवडणुकीपूर्वी नागरी संघटना इंडिया आघाडीच्या बाजूने एकवटल्या. त्यांचा परिणाम विक्रमी मताधिक्य मिळण्यात झाला.

बाळू धानोरकर 2014 च्या विधानसभेत वरोरा विधानसभेत शिवसेनेकडून रिंगणात होते. त्यांच्याविरोधात तत्कालीन पालकमंत्री काँग्रेसचे संजय देवतळे उभे होते. धानोरकर यांनी देवतळेंचा पराभव केला. सन 2019 मध्ये धानोरकर काँग्रेसकडून लोकसभेच्या रिंगणात होते. त्यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांचा पराभव केला. आता प्रतिभा धानोरकरांना यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला. त्यामुळे मंत्र्यांना पाडण्याचा धानोरकर पॅटर्न आता चांगलाच चर्चेत आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com